Maharashtra Politics : गांधींच्या लेखाला फडणवीसांचं उत्तर; गांधी विरुद्ध फडणवीस 'आर्टिकल वॉर', वाचा स्पेशल रिपोर्ट

Devendra Fadnavis News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकालावरून आर्टिकल वॉर आता सुरू झालं आहे. फडणवीसांनीही राहुल गांधी यांना लेखातून उत्तर दिलं.
Maharashtra Politics
Devendra FadnavisSaam tv
Published On

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा दावा करत राहुल गांधींनी आर्टिकल बॉम्ब टाकत निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. आणि भाजपलाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही एका लेखातूनच राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलंय..

Maharashtra Politics
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी सस्पेन्स वाढवला; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर केलं मोठं विधान, VIDEO

काँग्रेसच्या काळात निवडणूक आयुक्तांची सरकारकडूनच थेट निवड

26 पैकी 25 निवडणूक आयुक्तांची काँग्रेस सरकारकडून थेट निवड

प्रथमच आयुक्तांच्या नियुक्तीसाठी मोदींकडून विरोधी पक्षनेत्याची नेमणूक

शेवटच्या तासात 7.83 टक्के मतदान झालं यात विशेष काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्युत्तराच्या लेखावर विरोधी पक्षाने जोरदार टीका केलीय.. निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केल्याप्रकरणी फडणवीसांनी उत्तर देण्याचं कारण काय? असाही सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय...

Maharashtra Politics
Maharashtra Politics : जोरात मिळवुया हात; मनसे-ठाकरे गटाच्या नेत्याची हातमिळवणी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

तुम्ही जिंकले कसे हे महाराष्ट्राला माहीत, असे संजय राऊत म्हणाले. फडणवीस हे रामशास्त्री प्रभुणे नाही तर घाशीराम कोतवाल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. राहुल गांधींच्या लेखाला फडणवीसांनी प्रत्युत्तर देण्यावरुन टीकेची झोड उठली.त्यामुळे फडणवीसांनी पुन्हा राहुल गांधींना आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिलाय.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पैलवान चंद्रहार पाटील धनुष्यबाण हाती घेणार

निवडणुकीतील मॅच फिक्सिंगच्या आरोपाला निवडणूक आयोगानं न्यूज एजेन्सीमार्फत उत्तर दिलंय.. तर फडणवीसांनीही आर्टिकल वॉर छेडलंय.. मात्र आता फडणवीसांच्या दाव्यांना पुन्हा राहुल गांधी उत्तर देणार की या आर्टिकल वॉरला पूर्णविराम देऊन याच मुद्द्यावर पावसाळी अधिवेशन गाजवणार? याचीच उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com