Maharashtra politics girish mahajan big statement on ajit pawar in pune program  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: अजितदादा आमच्याकडे आले अन् माझं खातंच काढून घेतलं; भाजपचा बडा नेता भर कार्यक्रमात बोलला

Maharashtra Politics Latest News: भाजपकडे असलेलं अर्थखातं अजित पवारांना (Ajit Pawar) मिळालं, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे असणारं कृषी खातं अजित पवार यांच्या गटाकडे गेलं.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Politics Latest News: राष्ट्रवादीतून बंड करत उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वी सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ बड्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार सत्तेत सहभागी होताच राज्य मंत्रिमंडळाचा तिसऱ्या टप्प्यातील विस्तार रडखडला.(Latest Marathi News)

याशिवाय नव्या मंत्र्यांसाठी विद्यमान शिंदे-भाजपच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांमध्येही अदलाबदल करण्यात आले. भाजप तसेच शिंदे गटाकडे असलेली अनेक महत्वाची खाती अजित पवार गटाकडे गेली.

भाजपकडे असलेलं अर्थखातं अजित पवारांना (Ajit Pawar) मिळालं, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे असणारं कृषी खातं अजित पवार यांच्या गटाकडे गेलं. दरम्यान, महत्वाची खाती हातातून गेल्याने भाजप-शिंदे गटात नाराजी असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता भाजप नेते तसेच विद्यमान मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी उघडपणे भर कार्यक्रमात याबाबतची सल व्यक्त केली आहे.

गिरीष महाजन यांनी अत्यंत विनोदी पद्धतीने आपली सल बोलून दाखवली. अजित दादा आमच्याकडे आले आणि माझं क्रीडा खातं काढून घेतलं, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. पुण्यात छत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात ते बोलत होते.

या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, राज्यपाल रमेश बैस यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना गिरीष महाजन म्हणाले, अजित पवार आमच्यासोबत आले आणि माझं क्रीडा खातं काढून घेण्यात आलं.

आता ते का काढून घेतलं? ते मला आणि अजित दादांनाच माहिती. ते मी इथे सांगणार नाही, असं महाजन म्हणाले, गिरीष महाजन यांनी विनोदी पद्धतीने का होईना, पण भर कार्यक्रमात आपल्या मनातील सल बोलून दाखवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गटातील आमदारांसह आता भाजपच्या आमदारही नाराज आहेत का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT