Finance Minister Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Funding For NCP MLA By Finance Minister: अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, अर्थमंत्र्यांकडून राष्ट्रवादीच्या आमदारांवर निधीवर्षाव, किती निधी केला मंजूर?

Finance Minister Ajit Pawar News: अर्थखात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवार यांनी आठवडाभरातच राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीवर्षाव केला आहे.

Priya More

गिरीश कांबळे, मुंबई

Mumbai News: राष्ट्रवादीमध्ये (NCP) बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अजित पवार यांच्याकडे अर्थखात्याचा (Finance Department) कार्यभार देण्यात आला होता. खाते वाटपानंतर अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी तात्काळ सूत्रे हाती घेतली होती. आता अर्थखात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवार यांनी आठवडाभरातच राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीवर्षाव केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी अर्थखात्याची सुत्रे हाती घेताच आठवडाभरातच राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी वाटप केला आहे. या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी प्रत्येकी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये खास तरतूद करण्यात आली आहे.

विधिमंडळाला सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अजितदादांना साथ देण्याच्या निर्णयामुळे आपल्या मतदारसंघातील रखडलेल्या विकास कामांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर झाल्याचे आमदार सरोज अहिरे यांनी सोशल मीडियाद्वारे जाहीर केले आहे.

तर, नाराजी टाळण्यासाठी १५०० कोटींच्या तरतुदीतून राष्ट्रवादीबरोबरच शिंदे गटाच्या काही आमदारांच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यातूनच राष्ट्रवादीबरोबरच शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. अजित पवारांनी शिंदे गटाच्या काही आमदारांनाही निधी मंजूर करीत त्यांची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढण्यामागे निधीवाटप हे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT