Maharashtra NDA MPs Meeting With PM Modi
Maharashtra NDA MPs Meeting With PM ModiSAAM TV

PM Modi Called NDA MPs Meeting: पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रातील एनडीएच्या खासदारांसोबत बैठक; लोकसभेच्या मोर्चेबांधणीवर होणार चर्चा?

Maharashtra NDA MPs Meeting With PM Modi: पुढील आठवड्यात 3 ऑगस्टला नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे ही बैठक होण्याची शक्यता आहे.
Published on

>> प्रमोद जगताप, साम टीव्ही

PM Modi's meeting with NDA MPs from Maharashtra: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील एनडीएच्या खासदारांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पुढील आठवड्यात 3 ऑगस्टला नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे ही बैठक होण्याची शक्यता आहे. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून देशभरात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. महाराष्ट्रात देखील भाजपकडून 'मिशन 45'ची तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ही बैठक होणार असल्याची माहिती आहे.

मोदी एनडीएच्या सर्व खासदारांशी राज्यनिहाय संवाद साधणार

आगामी लोकसभा निवडणुकीत ५१ टक्के मते आणि साडेतीनशेहून अधिक जागांविर विजय मिळवण्याचं लक्ष्य भाजपने समोर ठेवलं आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी एनडीएच्या सर्व खासदारांशी राज्यनिहाय संवाद साधणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोदी महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील एनडीएच्या खासदारांना भेटणार आहेत. दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात तीन ऑगस्टला ही बैठक होऊ शकते, असे सुत्रांनी सांगितले.

Maharashtra NDA MPs Meeting With PM Modi
Maharashtra Rain Live Updates: कोल्हापूर जिल्ह्यातील चिखलीला पुराचा धोका, नागरिकांना गाव सोडण्याचे आदेश

भाजपचा महाराष्ट्रात लोकसभेसाठी मिशन 45 प्लसचा नारा

गेल्या आठवड्यातच एनडीएची बैठक पार पडली होती. या बैठकीतनंतर आता पंतप्रधान मोदी राज्यनिहाय खासदारांसोबत संवाद साधणार आहेत. याच साखळी बैठकीत ते महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातच्या खासदारांसोबत संवाद साधणार आहेत. भाजपाचा महाराष्ट्रात लोकसभेसाठी मिशन 45 प्लसचा नारा आहे. (Tajya Marathi Batmya)

भाजप आणखी 5 पक्षांना एनडीएमध्ये सहभागी करणार

भाजपा आणखी पाच पक्षांना एनडीएमध्ये सहभागी करणार असल्याची माहिती सध्या साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली जनता दल एनडीएमध्ये सहभागी होणार असून या दरम्यान काँग्रेसने त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर या पक्षांना हा पवित्रा घेतला. (Maharashtra Politics)

Maharashtra NDA MPs Meeting With PM Modi
Nashik Crime News: नाशिक हादरलं! भररस्त्यात धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, पाठलाग करून केले सपासप वार

बिहारमधील 3 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

बिहार विधानसभेतील विकसंशील इंसान पार्टीच्या चारपैकी तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष मुकेश सहानी यांनी एनडीएमध्ये सहभागी व्हावे यासाठी भाजप नेतृत्त्व प्रयत्नशील असल्याचं सुद्धा कळतंय. त्यामुळे मित्रपक्षांना मागणी वाढणार असल्याची चर्चा आहे. (Latest Political News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com