Nashik Crime News: नाशिक हादरलं! भररस्त्यात धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, पाठलाग करून केले सपासप वार

Nashik Youth Killed: दुचाकीवरुन जाणाऱ्या १९ वर्षीय तरुणाचा पाठलाग करत भररस्त्यात हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.
Nashik Crime News
Nashik Crime Newssaam tv

>> तबरेझ शेख, साम टीव्ही

Nashik Youth Killed On Road: दुचाकीवरुन जाणाऱ्या १९ वर्षीय तरुणाचा पाठलाग करत भररस्त्यात हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकच्या पुणे रोडवरील नासर्डी ब्रिज ते बोधलेनगर मार्गावर ही घटना घडली. या घटनेत तुषार देवराम चोरे नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने नाशिक हादरलं आहे.

नाशिकच्या बोधलेनगर परिसरात तुषार चोरे आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात होता. तेवढ्यात चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला आणि धारदार हत्याराने त्याच्यावर वार केले. या घटनेत तुषारचा अतिरक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला.

Nashik Crime News
Tansa Dam News: ठाण्यातील तानसा धरण ओसंडून वाहण्याची शक्यता, परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

मृत तुषार हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरुन जात असताना काही संशयित दुचाकीवरुन आले आणि त्यांनी नासर्डी ब्रिजपासून पाठलाग करुन त्याला गाठले. त्यानंतर उपनगर हद्दीतील बोधलेनगर परिसरात पोहोचताच त्याच्यावर धारदार सुरी आणि गुप्तीने सपासप वार केले. या हल्ल्यात तुषार जमीनीवर कोसळला. अतिरक्तस्त्रावर झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर दुचाकीवरील संशयित पसार झाले. (Tajya Marathi Batmya)

या हत्येचा संपर्ण घटनाक्रम पुणे रोडवर असलेल्या विविधखासगी दुकाने आणि आस्थापनांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, झोन दोनचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक विजय पगारे, युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की व युनिट दोनचे निरीक्षक रंजीत नलवडे आदींसह आधिकारी व अंमलदार दाखल झाले. (Breaking News)

Nashik Crime News
Megablock on Sunday: मुंबईकरांनो, आज तिन्ही मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक; जाणून घ्या कुठे आणि कधी? वाचा सविस्तर

तुषारचा मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी पाठविण्यात आला असून हल्लेखारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत. तुषारची हत्या कोणी आणि कशासाठी केली आहे याबाबत पोलीस तपास करत आहे. या घटनेप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भररस्त्यात तरुणाची हत्या करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. (Latest Political News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com