Tansa Dam News: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक असलेल्या तानसा धरण पावसामुळे भरून वाहण्याची शक्यता आहे. यामुळेच ठाणे जिल्ह्यात असलेल्या या धरणाखालील व नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तानसा धरणाची पाणी ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडी इतकी आहे. आज ही पातळी १२६.६०२ मीटर टीएसडी हून जास्त झाली आहे. यामुळेच प्रशासनाने या परिसरातील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरणाखालील व नदीच्या परिसरात कोणती गावे येतात
तानसा धरणाची पाणी ओसंडून वाहण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने धरणाखालील व नदीच्या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणातून विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)
हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले
दरम्यान, आज हतनूर धरणाचे ४१ दरवाजे पुर्ण क्षमतेने उघडल्याने तापी नदीपात्रात १३७०९३ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. हतनूर धरणाखालील जळगाव (Jalgaon) व धुळे जिल्ह्यातील तापी नदी काठावरील लोकांना संबंधित यंत्रणेकडून अति सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भ व जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तापी नदीच्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला असून नागरिकांनी सावधानी बाळगावी, असे आव्हान करण्यात आले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.