Sanjay Raut News: विरोधी पक्षांच्या बंगळुरुतील बैठकीत नेमकं काय घडलं? संजय राऊतांनी आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीतीच सांगितली

विरोधकांच्या बैठकीत नेमकं काय घडलं, याविषयी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातून सविस्तर भाष्य केलं आहे.
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSaam tv
Published On

Sanjay raut News: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहे. मोदी सरकारला सत्तेवरून हटविण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बैठका सुरू केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच २६ विरोधी पक्षांची आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूत बैठक पार पडली. या बैठकीत नेमकं काय घडलं, याविषयी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातून सविस्तर भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)

संजय राऊत यांनी सामना दैनिकातील 'रोखठोक' सदरातून सविस्तर भाष्य केलं आहे. संजय राऊत म्हणाले, 'बंगळुरूसाठी विमानतळावर निघताना मुंबईतील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्याची भेट अचानक झाली. ते 'एनडीए' बैठकीसाठी दिल्लीत निघाले होते. मी सांगितले, 'आम्ही बंगळुरात निघालोय' यावर त्यांचा प्रश्न, 'तेथे जाऊन आता काय साध्य होणार? मी म्हणालो, 'काय होणार? ते शेवटी जनताच ठरवेल'.

Sanjay Raut News
Pune News: इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर पुणे अलर्ट मोडवर, जिल्हा प्रशासनाने 'या' 23 गावांवर केलं लक्ष केंद्रीत...

'पीएम मोदींचा पराभव का करायचा, या प्रश्नावर उत्तर देताना राऊत म्हणाले, 'देशातील हुकूमशाही संपवून लोकशाही टिकविण्यासाठी. आज सत्तेचे, संपत्तीचे विकेंद्रीकरण पूर्णपणे संपले आहे. सत्ता व संपत्ती फक्त दोन-चार लोकांच्याच हाती एकवटली आहे. हे चित्र तुम्हाला पटते काय? असा प्रश्न राऊत यांनी केला.

'भारतीय राजकारण हे आता मतदारांवर अवलंबून नाही. ते फक्त मोदी, शहा, ईडी, सीबीआय, उद्योगपती अदानी व अंबानी ठरवतात. त्यासाठी तंत्र, मंत्र, धर्म सर्व वापरले जाते, असे राऊत म्हणाले.

'बंगळुरूमध्ये जमलेल्या सर्व राजकीय पक्षांचे वातावरण खेळीमेळीचे होते. बंगळुरूच्या विमानतळावर खासगी विमानांचे पार्किंग त्या दिवशी पाहण्यासारखे होते. 17 तारखेच्या संध्याकाळी सोनिया गांधी यांनी सर्व निमंत्रितांसाठी जेवण ठेवले व संपूर्ण 'भारत' त्या रात्री एका टेबलावर स्नेहभोजनास जमलेला दिसला. फक्त मोदी किंवा भाजप म्हणजे भारत नाही हे त्या रात्री स्पष्ट झाले, असेही राऊत म्हणाले.

Sanjay Raut News
PM Modi Called NDA MPs Meeting: पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रातील एनडीएच्या खासदारांसोबत बैठक; लोकसभेच्या मोर्चेबांधणीवर होणार चर्चा?

'एनडीए'च्या बैठकीत 38 पक्ष होते. त्यातील 26 पक्षांचे त्या त्या राज्यातही अस्तित्व नव्हते. काही पक्ष तर तालुका स्तरावरच होते. महाराष्ट्रातून विनय कोरे, बच्चू कडू, गोव्यातून सरदेसाई हे त्या 38 मध्ये होते. या 26 पक्षांचा एकही खासदार नाही, पण 38 पक्षांचा नवा एनडीए निर्माण करून मोदी ऐट दाखवत आहेत ती व्यर्थ आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

'देशाच्या राजकारणातून 2014 पासून दिलदारीचे पूर्ण उच्चाटन झाले. त्या दिलदार इंडियाचे नवे रोपटे पुन्हा बंगळुरूच्या भूमीत लागले. 2024 पर्यंत त्याचा महावृक्ष होवो, अशी इच्छा राऊतांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com