Leaders from the Nationalist Congress Party factions meet in Pune amid growing buzz over reunification talks involving Ajit Pawar and Sharad Pawar. saam tv
मुंबई/पुणे

NCP Merger: राष्ट्रवादी विलीनीकरणाचं पहिलं पाऊल? महाराष्ट्राच्या राजकारणात नवं समीकरण

NCP Merger Pune Politics: पुणे जिल्ह्यात अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील एका नवीन राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीनीकरणाच्या दिशेने पहिले पाऊल पडण्याचे संकेत मिळत आहेत.

Bharat Jadhav

  • अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांची पुण्यात बैठक.

  • जुन्नरमध्ये दोन्ही गटांनी एकत्र काम करण्याचा निर्णय.

  • स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी एकत्र लढण्याचे संकेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन्ही शकले एक होण्याबाबत नेत्यांची वेगवेगळी विधान कानी पडत आहेत. अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांची विलीनीकरणासंदर्भात बैठका झाल्या होत्या असा दावा शरद पवार गटातील नेते करत आहेत. विलीनीकरणासाठी आधी शरद पवार गोटातूनच दावे करण्यात येत होते. आता अजितदादांच्या राष्ट्रवादीमधूनही हा आवाज बुलंद होताना दिसतोय. त्याचदरम्यान पुण्यात राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनीकरणाच पहिलं पाऊल पडलं असून दोन्ही गटातील नेत्यांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतलाय.

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आली आहेत. येतील जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके आणि शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतलाय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला होता. याच पार्श्वभूमीवर जुन्नरमध्ये पहिलं पाऊल पडलंय. दरम्यान आज शरद पवार गटाचे नेते आणि अजित पवार गटाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती माजी आमदार बेनके यांनी माध्यमांना दिली.

आम्ही सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. आज त्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सांगितलं की, आम्ही दोन्ही गटातील नेते एकत्र राहणार आहोत. एकत्रच पुढील वाटचाल करणार आहोत, असं अतुल बेनके म्हणालेत.

मतदारसंघातील परिस्थितीवर अवलंबून - तटकरे

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांबाबत आणि अतुल बेनके यांच्या विधानावर सुनिल तटकरे यांनीही प्रतिक्रिया दिलीय. अतुल बेनके हे आमचे तरुण नेते आहेत. विधानसभेत त्यांना पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे त्यांच्या विधानसभेच्या मतदारसंघात परिस्थिती वेगळी असेल. त्यावरून ते बोलले असतील. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती असू शकते, असं सुनिल तटकरे म्हणालेत.

आमदार हिरामण खोसकर यांची विलीनीकरणासाठी आग्रही

अजितदादा यांच्या गटातील आमदार हिरामण खोसकर यांनी विलीनीकरणाबाबत मोठा दावा केलाय. हिरामण खोसकर हे इगतपुरीचे आमदार आहेत. खोसकर यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. विलीनीकरणाबाबत ते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना विनंती करणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण शंभर टक्के झाले पाहिजे.

जर दोन्ही पक्षांना जर वाटतं असेल की आपला नेता गेला. लीडर गेला. नेत्याला जर खरी श्रद्धांजली वाहायची असेन तर त्यांचे जे दोन-तीन महिन्यापासून सुरू होतं की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं. तसे झाले तर आम्हाला आनंद होईल. आम्हाला सुनेत्रा पवार या गॉडफादर आहेत. पण त्यांच्या मागे दोन्ही पक्षांनी भक्कम पाठिंबा द्यायला हवा असे हिरामण खोसकर म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

Maharashtra News Live Update: पुणे विषारी दारू प्रकरण, दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

भाजपचा दणदणीत पराभव! 'आप'चा 900 जागांवर विजय, काँग्रेसची अवस्था काय?

Avoiding Chips and Cold Drink: चिप्स खाणं आणि कोल्ड ड्रिंक्स पीणं २१ दिवस बंद केल्यावर शरिरावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT