Sharad Pawar, Supriya Sule, Ajit Pawar maharashtra Political News in Marathi Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: शरद पवार की अजित पवार, खरी राष्ट्रवादी कोणाची? ६ ऑक्टोबरला होणार सुनावणी

Ajit Pawar vs Sharad Pawar: निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीत फूट पडल्याचं मान्य केलं असून दोन्ही गटांना ६ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी बोलावलं आहे.

Satish Daud

Ajit Pawar vs Sharad Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. आता या फुटीचे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले आहे. आम्हीच खरी राष्ट्रवादी असा दावा अजित पवार गटाने निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीत फूट पडल्याचं मान्य केलं असून दोन्ही गटांना ६ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी बोलावलं आहे. (Latest Marathi News)

शिवसेनापाठोपाठ आता राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात पोहचला आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत ही सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीत शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट आपली भूमिका निवडणूक आयोगासमोर मांडणार आहेत.

यापूर्वी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून (Sharad Pawar) अजित पवार गटाने केलेले सर्व दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. शरद पवार गटाकडून पक्षात फूट पडली नसून शरद पवार हेच अध्यक्ष असल्याबाबत सांगण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचाही असाच वाद निवडणूक आयोगात सुरू होता.

आता तसाच वाद राष्ट्रवादी काँग्रेसचाही सुरू होणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, खासदार शरद पवार यांनी नऊ आमदारांच्या विरोधात याचिका दाखल केल्याचे बोलले जात आहे. तसेच निवडणूक आयोगात अजित पवार गटाने केलेले दावेही शरद पवार गटाने फेटाळले आहेत.

यात २०२२ मध्ये जी राष्ट्रीय कार्यकारणी झाली आहे त्याचे दाखले दिले आहेत. सध्यातरी आमदारांचं संख्याबळ अजित पवार यांच्या गटाकडे असल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेप्रमाणे आयोगाने निर्णय घ्यायचं ठरवलं तर अजित पवारांना घड्याळ चिन्ह मिळू शकतं. परंतु आयोग कोणत्या गटाचे पुरावे ग्राह्य धरणार, हे येत्या काळामध्ये दिसून येईल.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT