Devendra Fadnavis  Saam Tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis: संपत्तीचे प्रदर्शन न करता साधेपणाने वावरा; फडणवीसांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान

Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर येथील भाजपच्या कार्यालयात पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, लोकसभा मतदारसंघ संयोजक यांच्यासह पक्षाच्या वेगवेगळ्या आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

सुरज सावंत

सूरज सावंत

Political News:

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अनेक इच्छुक उमेदवार हे 'भावी खासदार' त्याचबरोबर आपल्या धनलक्ष्मीचं ठीक ठिकाणी प्रदर्शन घडवत असून तसे करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होतो. पक्षाला समजते, त्यांना हे सांगण्याची गरज नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर येथील भाजपच्या कार्यालयात पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, लोकसभा मतदारसंघ संयोजक यांच्यासह पक्षाच्या वेगवेगळ्या आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोदींची व्होटबँक ही जातीपातींपलीकडची आहे. निवडणुकीची लढाई ही थंड डोक्याने लढवायची असते", मित्र पक्षाच्या सहभागामुळे अनेक ठिकाणी नाराजी असली तरी शिवसेनेशी भावनिक तर राष्ट्रवादी काँग्रेसशी धोरणात्मक युती असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

"तुम्हाला कोणत्या गोष्टी पटत नसतील तर ते सांगा,पण पक्षाबाहेर बोलू नका. वाचाळवीरांना आवरावेच लागेल. सर्वांचे वहीखाते पक्षाकडे आहे", असा दमही फडणवीस यांनी यावेळी बैठकित उपस्थित असलेल्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे दिला.

तसेच निवडणुका तोंडावर आहेत, पक्षाच्या नेत्यांनी संपत्तीचे प्रदर्शन न करता साधेपणाने राहण्याच्या सूचना शनिवारी प्रदेश पदाधिकारी व नेत्यांना फडणवीस यांनी दिल्या आहेत. इतकच नाही तर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या भाजपमधील नेत्यांनी "भावी खासदार म्हणून पोस्टर लावण्याच्या भानगडीत पडू नका, काहीजण तसे करत आहेत. पण तसे करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होतो. पक्षाला समजते, त्यांना हे सांगण्याची गरज नाही." अशा शब्दात फडणवीस यांनी कान टोचले.

"तिकीट कुणाला मिळणार, हे पक्षाचे संसदीय मंडळ, ज्येष्ठ नेते ठरवणार आहेत. त्यात डोकं लावू नका. सामान्य, गरीब माणसांशी संपर्क ठेवा. कोणत्याही सर्व्हेक्षणात न येणारी तीच आपली व्होटबँक आहे." अशा सूचना फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Failure Symptoms: किडनी फेल्युअरची 'ही' लक्षणं लघवीद्वारे दिसतात, वेळीच लक्ष द्या

Pankaja Munde: कुणाची सुपारी घेऊन आलात..., पंकजा मुंडे भगवान गडावरील मेळाव्यात नेमक्या कुणावर चिडल्या?

Hair Care : केस मोकळे ठेवून झोपावं की बांधून? वाचा फायदे-तोटे

Electric Shock : वेल्डिंग काम करताना घडले दुर्दैवी; विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू

Palak Pakoda: नाश्त्याला बनवा कुरकुरीत पालक पकोडा; सोपी रेसिपी करा फॉलो

SCROLL FOR NEXT