Deepak Kesarkar said Aditya Thackeray played a major role in break BJP-Shiv Sena alliance Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: भाजप-शिवसेना युती तोडण्यात आदित्य ठाकरेंचा मोठा वाटा; शिंदे गटातील बड्या नेत्याचा दावा

Satish Daud

Maharashtra Political News

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकासआघाडीने कंबर कसली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आपल्या दौऱ्याला सुरूवात केली असून ते ९ आणि १ जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, यावरून शिंदे गटातील नेते दीपक केसरकर यांनी टीका केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना सगळीकडे दौरे करू द्या, खरेतर भाजप-शिवसेना युती तुटण्यामागे त्यांचा मोठा वाटा होता, हे जनतेला कळत आहे. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून गेले आहेत. इकडे येऊन ते काँग्रेसचेच विचार सांगतील, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

दीपक केसरकर यांनी जागा वाटपावरही भाष्य केलं आहे. जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार वरिष्ठांना आहे. त्यामुळे कोणी काही मागणी केली तरी हरकत नाही. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. त्यामुळे तिथे शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे, असं केसरकर म्हणाले.

लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसंवाद यात्रा राज्यभरात सुरू होणार आहे. कोल्हापुरात या महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांचा दौरा असेल. कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्ही मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा होतील, असंही केसरकर यांनी सांगितलं आहे.

देशभरासह राज्यात सुरू असलेल्या ट्रकचालकांच्या संपाबाबत देखील केसरकर यांनी भाष्य केलं. संपात सहभागी झालेल्या स्कूल बस चालकांना संपात सहभागी होऊ नये, अशा सूचना आम्ही दिल्या आहेत. स्कूल बस चालक संपात सहभागी झाल्यास त्यांच्यावर कारवाईबाबत उद्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊ, असा इशाराही केसरकर यांनी दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT