Nana Patole News Saam Tv
मुंबई/पुणे

Nana Patole News: 'सर्वसामान्यांना जगू न देणे ही भाजपची प्रवृत्ती...' कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे टीकास्त्र

पुण्यात काँगेसतर्फे पश्चिम महाराष्ट्र जिल्हा विभाग निहाय बैठक घेण्यात आली.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Nana Patole News:

सर्वच राजकीय पक्षांना आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूकांचे वेध लागले आहेत. या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज पुण्यात काँगेसतर्फे पश्चिम महाराष्ट्र जिल्हा विभाग निहाय बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

काय म्हणाले नाना पटोले?

"राज्यात नागरिकांचा सरकारी दवाखान्यांमध्ये मृत्यू होत आहे. शेतकरी मरत आहेत, मात्र राज्य सरकारला कोणाचीच चिंता नाही. महाराष्ट्र सरकार सेल्फिश सरकार आहे आणि दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री पदावर डोळा आहे," अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला.

यावेळी बोलताना नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवरही (BJP) जोरदार टीका केली. सर्व सामान्य लोकांना न जगू देणे म्हणजे ही भाजपची प्रवृत्ती आहे असे म्हणत भाजप राहुल गांधी (Rahul Gandji) यांना जर रावण म्हणत असतील तर महागाई, बेरोजगारी कोणी वाढवली? असा सवाल त्यांनी विचारला.

तसेच पक्षाच्या संघटनात्मक बैठका राज्यात सुरू आहेत. काँग्रेस आता भाजपच्या रावण प्रवृत्तीचा चेहरा दाखवण्यासाठी राज्यभर दौरे करणार, अशी माहितीही नाना पटोले यांनी यावेळी दिली. पुण्यातील कॉंग्रेस भवनात ही बैठक पार पडली. बैठकीला अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांची उपस्थिती होती. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ram Charan अनवाणी पायाने एअरपोर्टवर स्पॉट, नेमकं कारण काय? पाहा VIDEO

Viral Video: आजी जोमात बाकी कोमात, अस्सल डान्सरसोबत जुगलबंदी, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल एकदम कडक!

Dhananjay Mahadik: 'लाडक्या बहि‍णी'बद्दल आधी वादग्रस्त वक्तव्य, आता स्पष्टीकरण, काय म्हणाले धनंजय महाडिक...

NeechBhang Rajyog: 12 महिन्यांनी तयार झाला नीचभंग राजयोग; चंद्र-मंगळ 'या' राशींना करणार मालामाल

Viral Vidoe : नाद करा पण काकांचा कुठे! चक्क डबल-डेकर सायकलवर प्रवास, व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले खूश

SCROLL FOR NEXT