Supriya Sule : शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार नाहीत, सुप्रिया सुळेंनी केलं स्पष्ट

Political News : मेळाव्यात माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी करण्याचा संकल्प केला.
Supriya Sule
Supriya SuleSaam TV
Published On

Pandhrpur News :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार स्वत: लोकसभेच्या मैदानात उतरतील अशी चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत माळशिरस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी मेळावा पार पडला.

मेळाव्यात माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी करण्याचा संकल्प केला. यावेळी माढ्यातून शरद पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (Political News)

मात्र शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार नाहीत, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. स्थानिक कार्यकर्त्यांला संधी द्या. शरद पवार साहेब यांची राज्यसभेचे आणखी तीन वर्षं आहेत. त्यामुळे माढ्यातून शरद पवार निवडणूक लढणार नाहीत, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

Supriya Sule
Raj Thackeray News: 'मुख्यमंत्रीही ठाण्याचे, लोकांचा आक्रोश त्यांना परवडणारा नाही...' टोल दरवाढीवरुन राज ठाकरेंचा इशारा

बारामती लोकसभा निवडणुकीत विरोधात कोण?

बारातमीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, मी बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे तिकीट मागणार आहे. माझ्याविरोधात कोण आहे, मला माहिती नाही.

Supriya Sule
Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग; घटस्थापनेचा मुहूर्त ठरला?

ईडीच्या कारवाया विरोधी पक्षांवरच

सुप्रिया सुळे यांना यावेळी केंद्र सरकारवही हल्लाबोल केला. ईडीच्या रेड विरोधी पक्षातील नेत्यांवरच वाढल्या आहेत. 90 ते 95 टक्के केसेस विरोधी पक्षातील नेत्यांवर आहेत. भाजपच्या वॉशिंग मशीनमधून स्वच्छ झाल्यावर त्या केसेस विरघळून जातात.सुप्रीम कोर्टाने देखील सीबीआय, ईडीच्या वापरावर ताशेरे ओढले आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com