Mumbai News : मनसेचा इशारा, ठाकरे गटाची अ‍ॅक्शन; घाटकोपरमधील गुजराती बोर्डची तोडफोड

Ghatkoper Gujrati Board : मनसेने देखील हे नाव काढण्याची मागणी केली होती.
Mumbai News
Mumbai NewsSaam TV
Published On

रुपाली बडवे

Mumbai News :

मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. मुंबईतील तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला काही दिवसांपूर्वी मुलुंड येथे ऑफिस भाड्याने देण्यास नकार दिला होता. तेव्हा मनसेने आपल्या स्टाईलने सोसायटीच्या सेक्रेटरीला दणका दिला. त्यानंतर मनसेने मुंबईत गुजराती पाट्यांवरुन मोहिमच उघडली. मात्र या मुद्द्यावरुन शिवसेना ठाकरे गट देखील आता आक्रमक झाला आहे.

मुंबईतील घाटकोपर येथे गुजराती भाषेतून लावण्यात आलेल्या बोर्डची ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना तोडफोड केली आहे. सोशल मीडियावर घाटकोपर पूर्व येथील उद्यानाला लावण्यात आलेल्या 'मारु घाटकोपर' हे गुजराती मधले नाव शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तोडफोड करुन हटवले आहे.  (Latest Marathi News)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हे गुजरातीमध्ये असलेले नाव मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत होते. मनसेने देखील हे नाव काढण्याची मागणी केली होती. मात्र मध्यरात्री शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी त्याची तोडफोड केली आहे. यामुळे पुन्हा एकदा मराठी-गुजराती वाद पेटण्याची शक्यता आहे.

Mumbai News
Beed News: 'सत्कार सोहळे नको, मला काम करू द्या', धनंजय मुंडे असं का म्हणाले?

मनसे सरचिटणीस अखिल चित्रे यांचे ट्वीट

मनसे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी याबाबत ट्वीट करत म्हटलं होतं की, एका वृत्तवाहिनीला माहिती देत असताना मुंबई महापालिकेचे परीरक्षण सहाय्यक अभियंता असं म्हणाले की, घाटकोपर येथील स्थानिक भाषा गुजराती असल्यामुळे गुजराती भाषेत फलक लावले ते चुकीचे नाही. या महाशयाने विसरू नये की घाटकोपर मुंबईत आहे आणि मुंबई महाराष्ट्रात आणि इथली राजभाषा मराठी आहे. लक्षात असू द्या तुम्ही मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आहात गुजरातचे नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com