'हार तुरे आणि सत्कार सोहळे नको, मला काम करू द्या', असे म्हणत गावागावातील सत्कार टाळत फक्त निवेदने स्वीकारीत धनंजय मुंडेंनी बिडकडे प्रवास केला. नेहमी हार, तुरे, पुष्पगुच्छ आदींनी भरलेली धनंजय मुंडे यांच्या गाडीची डिक्की आज मात्र निवेदनाच्या थप्पीने भरल्याचं पाहायला मिळालं.
गेल्या दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांची बीडच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे हाती घेल्यानंतर आज प्रथमच ते अहमदनगर येथील 'शब्दगंध' या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करून बीडकडे निघाले होते. यावेळी आष्टी तालुक्याच्या हद्दीपासून जागोजाग गावोगावी लोक रस्त्यावर उतरून धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी उभे होते. (Latest Marathi News)
धनंजय मुंडे यांनी गाडीतून खाली उतरून फुलांनी भरलेल्या जेसीबी बाजूला काढायला लावून, 'तुमचे हार तुरे नको, आता मला काम करू द्या, कामाची निवेदने द्या' असे म्हणत हार तुरे नाकारले.
बीड जिल्ह्याच्या हद्दीवर दौला वडगाव, चिंचपूर, धामणगाव, अमळनेर, म्हसोबची वाडी, हातोला, जवळागिरी, गणेशगड, लिंबा देवी फाटा अशा अनेक ठिकाणी त्यांनी सत्कार नाकारून केवळ निवेदने स्वीकारली. यावेळी सोबत आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्यासह अनेक पदाधिकारी सोबत होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.