Lok Sabha Survey: लोकसभा निवडणूक झाली तर महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळणार? भाजप - उद्धव गट सर्वेक्षणात कोण पुढे?

Maharashtra Lok Sabha Survey: लोकसभा निवडणूक झाली तर महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळणार? भाजप - उद्धव गट सर्वेक्षणात कोण पुढे?
Maharashtra Lok Sabha Survey
Maharashtra Lok Sabha SurveySaam Tv
Published On

Maharashtra Lok Sabha Survey:

लोकसभा निवडणुकीचा काळ जसजसा जवळ येत आहे, तसेच लोकांच्या मनात काय आहे? मतदार कोणाच्या बाजूने आपला कौल देणार, यासाठी अनेक संस्थांकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. अशातच महाराष्ट्रातही सर्वेक्षण करण्यात आलं आहे. सर्वेक्षणाच्या निकालाने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडी आघाडीला दिलासा मिळाला आहे.

तर काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या महाविकास आघाडीसाठी चिंताजनक आहे. हे सर्वेक्षण इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स यांनी मिळून केलं आहे.

Maharashtra Lok Sabha Survey
Jitendra Awhad News: 'फक्त राजकीय लढाई जिंकण्यासाठी शरद पवारांकडे बोट...' सुनावणीबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड भावुक

महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांवर भाजप ३२ टक्के मतांनी आघाडीवर आहे. त्याचवेळी शिवसेनेला (शिंदे) १० टक्के आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ५ टक्के मते मिळतील, असा अंदाज सर्वेक्षणात मांडण्यात आला आहे. यातच १५ टक्के मतांसह काँग्रेस येथे मागे पडल्याचं यात दिसत आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेनेचीही अवस्था बिकट आहे. पवारांच्या पक्षाला 12 टक्के मते मिळताना दिसत आहेत. त्याचवेळी उद्धव यांच्या शिवसेनेला १५ टक्के मतांवर समाधान मानावे लागू शकते. ११ टक्के मते इतरांच्या खात्यात जाऊ शकतात.

Maharashtra Lok Sabha Survey
Amazon सेल सुरू, 86 हजारांचा 58 इंच 4K स्मार्ट टीव्ही फक्त 23 हजारात खरेदी करण्याची संधी

मतांची टक्केवारी जागांमध्ये रूपांतरित झाल्यास भाजपला येथे २२ जागा मिळण्याची शक्यता आहे, जी सर्वाधिक आहे. त्याचवेळी शिवसेनेला (शिंदे) ४ जागांवर तर राष्ट्रवादीला (अजित) २ जागांवर समाधान मानावे लागू शकते. काँग्रेसला ९ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तीन जागा मिळताना दिसत आहेत.

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला आठ जागांचा फायदा होताना दिसत आहे. ठाकरे गटाला दोन जागांचा फायदा होताना दिसत आहे. त्यांनाही ८ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com