Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : वर्षा बंगल्यावर बैठकांचा धडाका, मध्यरात्री दीड तास खलबतं; महायुतीच्या गोटात शिजतंय काय?

Maharashtra Political Latest News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मंगळवारी रात्री पुन्हा एकदा वर्षा बंगल्यावर बैठक झाली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड ते दोन तास चर्चा झाली.

Satish Daud

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मंगळवारी रात्री पुन्हा एकदा वर्षा बंगल्यावर बैठक झाली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड ते दोन तास चर्चा झाली. बंद दाराआड झालेल्या या बैठकीत राज्यातील राजकीय मुद्द्यावर खलबतं झाल्याचं सांगितलं जातंय. तसेच शुक्रवारपासून सुरू होणारं पावसाळी अधिवेशन आणि मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.

येत्या शुक्रवारपासून (ता २८ जून) विधानसभेचं पावसाची अधिवेशन सुरू होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी होणारे हे शेवटचे अधिवेशन असेल. त्यामुळे या अधिवेशनात विरोधकांचा राज्यातील विविध मुद्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न असेल.

त्याला महायुती म्हणून कसं सामोरे जायचं यावर रणनिती आखण्यात आल्याची माहिती आहे. अधिवेशन काळात महायुतीच्या तिन्ही पक्षात उत्तम समन्वय राहावा. नेत्यांनी किरकोळ विषयांवरून एकमेकांसोबतचे वाद टाळावे. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांना सडेतोड उत्तरे द्यावी, याबाबतही चर्चा झाल्याचं समजतंय.

दरम्यान, अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात यावा, अशी महायुतीतील अनेक आमदारांची इच्छा होती. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्तार हा अधिवेशनानंतरच घेतला जाईल. त्यामुळे आपआपल्या पक्षातील आमदारांना धीर धरायला लावा, असंही बैठकीत सांगण्यात आल्याचं कळतंय.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आल्यानंतर काही पराभूत उमेदवारांनी एकमेकांकडे बोटं दाखवत निवडणूक काम न केल्याच्या तक्रारी केल्या होत्या. यामुळे महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर देखील बैठकीत चर्चा करण्यात आली. कोणत्याही नेत्याने कॅमेऱ्यासमोर उघडपणे भाष्य करणे टाळावे, काही तक्रारी असल्यास पक्षातील वरिष्ठ नेत्याला माहिती द्यावी, असंही बैठकीत ठरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earth Threat : 116 दिवसात जग नष्ट होणार? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जगावर मोठं संकट, वाचा स्पेशल रिपोर्ट

Viksit Bharat Rozgar Yojana : साडेतीन कोटी तरूणांना 15 हजार मिळणार, स्वातंत्र्यदिनी मोदींचं गिफ्ट; कोण ठरणार पात्र?

Maharashtra Live Update: गिरगावचा महाराजा मुखदर्शन, गिरगावच्या महाराजा साकारतोय जगन्नाथ भव्यरूप

Accident : स्वातंत्र्यदिनासाठी निघाला, बाईक स्लीप झाली अन् कंटेनरच्या खाली आला, विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

SCROLL FOR NEXT