Devendra Fadnavis, Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: अजितदादांचा पुणेकरांसाठी मोठा वादा, देवेंद्र फडणीस म्हणाले - 'घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं'

Devendra Fadnavis On Ajit Pawar: पुणे महापालिकेवर सत्ता आल्यानंतर पुणेकरांना मेट्रो प्रवास मोफत करू अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना टोला लगावला.

Priya More

Summary -

  • पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांची मोठी घोषणा

  • अजित पवारांची पुणे मेट्रो मोफत करण्याची केली घोषणा

  • अजित पवारांच्या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना टोला लगावला

  • घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं, असं फडणवीस म्हणाले

महानगर पालिका निवडणुकीसाठी आता अवघे ३ दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. रविवार हा सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रचाराचा सुपर संडे ठरला. या प्रचारसभांमध्ये राजकीय नेत्यांकडून अनेक घोषणांचा आणि आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांसाठी मोठी घोषणा केली. पुणे महापालिकेवर सत्ता आल्यावर पुणेकरांना मेट्रो मोफत करणार असल्याची घोषणा त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात केली.

त्यांच्या या घोषणेची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. अनेकांनी या घोषणेनंतर भुवया उंचावल्या. अजित पवारांच्या या घोषणेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत त्यांची खिल्ली उडवली. घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं. किमान लोकांचा विश्वास बसेल अशा गोष्टी बोलाव्यात, अशा शब्दात फडणवीस यांनी अजित पवारांना टोला लगावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'संवाद पुणेकरांशी' या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांच्यावर टीका केली. अजित पवार बोलतात. तर माझं काम बोलतं. १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी अजित पवार यांनी पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास मोफत करू या आश्वासनावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'आज मी जाहीर करणार होतो की पुण्यातून उडणारी जेवढी विमान आहेत, त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे, अनाउन्स करायला काय जातंय, अनाउन्स करायला आपल्या बापाचं काय जातंय.' मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरानंतर कार्यक्रमाला उपस्थितीत असलेले सर्वजण हसू लागले.

अजित पवार यांनी पुणेकरांसाठी केलेल्या घोषणेची खिल्ली उडवत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'आम्ही राजकीय क्षेत्रातील लोक आहोत, अनेक वेळा निवडणुका जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो. त्या जाहीरनाम्यामध्ये काहीही म्हणतो पण तरी माझं म्हणणं आहे की किमान जनतेला विश्वास बसेल अशा तरी गोष्टी म्हटल्या पाहिजे. ज्या आपण करू शकू.'

मुख्यमंत्र्यानी पुढे अजित पवारांना असाही टोला लगावला की, 'अजित पवार फक्त बोलतात. माझं काम बोलतं. मी आत्तापर्यंत संयम पाळला त्यांचा संयम ढासळला आहे. १५ तारखेनंतर अजितदादा नाही बोलणार. देवेंद्र फडणवीस बोलणार आहे.' यावेळी फडणवीसांनी ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'कुठलाही परिवार एकत्र येत असेल तर मला आनंद आहे. राज ठाकरे यांनी मला क्रेडिट दिलं त्यांचं मी आभार मानतो. त्यांचा मला आशीर्वाद मिळेल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara : अन् अचानक आकाशातून पडले दगडाचे तुकडे, भंडार्‍यात उल्का वर्षाव झाल्याचा संशय, नेमकं सत्य काय?

Homemade Toner : तुम्हाला त्वचेचा ग्लो वाढवायचा आहे? मग हे ५ स्वस्तात मस्त टोनर घरीच बनवा

Prasar Bharti Jobs: प्रसार भारतीमध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Bigg Boss Winner : बिग बॉसच्या विजेत्यानं दिली प्रेमाची कबुली, 'सौंदर्या'सोबतचा रोमँटिक PHOTOS शेअर

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT