prajakt tanpure Saam
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: मोठी बातमी! शरद पवारांना मोठा धक्का, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपामध्ये प्रवेश

Prajajta Tanpur Join BJP: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. आज त्यांनी मुंबईत रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

Priya More
  • महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड

  • शरद पवारांना मोठा धक्का

  • प्राजक्त तनपुरेंचा भाजपमध्ये प्रवेश

  • राष्ट्रवादीचे माजी मंत्री भाजपमध्ये

  • विधान परिषद उमेदवारीची शक्यता

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतलं. प्राजक्त तनपुरे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. प्राजक्त तनुपरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 'पक्ष जी जबाबदारी देईल ती मी चांगल्या पद्धतीने पार पाडेन.', असे प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात होते. ते महाविकास आघाडीच्या काळामध्ये मंत्री होते. प्राजक्त तनपुरे यांना पहिल्यांदा आमदार होताच मंत्रिपद मिळाले होते. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव केला होता. त्यांची राजकीय घराण्याची पार्श्वभूमी आहे. राष्ट्रवादीतून प्राजक्त तनपुरे यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे ते पुत्र आहेत. तर जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे २० वर्षे आमदार होते.

प्राजक्त तनपुरे हे अहिल्यानगरमधील मोठे नेते आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते. आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपकडून विधान परिषदेतून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. तनपुरे यांनी काही दिवसांपूर्वी स्वत:चे फेसबुक प्रोफाईल बदलले होते. प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतली होती. अक्षय कर्डिलेविरोधात ते निवडणूक लढवणार होते पण त्यांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे ते चर्चेत आले होते.

दरम्यान, प्राजक्त तनपुरे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरेंनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली होती. 'माझ्यासोबत पक्षात असणारे तिघेजण राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेले, तिकडे त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. मात्र दुसरीकडे आमच्यासारखे निष्ठा ठेवणाऱ्या राजकारण्यांचे राजकारण संपत चाललंय, याचे दुःख आहे.', असे ते म्हणाले होते.

दरम्यान, प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशानंतर राहुरीत मोठा जल्लोष बघायला मिळत आहे. समर्थकांनी तनपुरेंच्या ऑफिसबाहेर फटाक्यांची आतीषबाजी करत भारतीय जनता पार्टीचा जयघोष केला. तनपुरे यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने राहुरी मतदारसंघासह अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाने कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेनेच्या वर्धापन दिनी भावनांचा बांध फुटला; सुषमा अंधारेंना रडू कोसळले|VIDEO

Maharashtra News Live Update: मोबाईल, सोने अर्ध्या किमतीत देतो सांगून फसवणाऱ्या ठगाला पोलिसांनी केली अटक

कोणतीही ऑफर नाही; पहिल्या दिवसापासून ठाकरेंसोबतच! शिवसेनेच्या निष्ठावंत खासदाराची ठाम भूमिका|VIDEO

Meloni Vs Trump : मेलोनी डोनाल्ड ट्रम्पवर संतापल्या; म्हणाल्या, मी कधीच कुणाकडे भीक मागत नाही!

Father’s Day Gift Ideas: फादर्स डे ला वडिलांच्या चेहऱ्यावर आणा हसू; हे ७ गिफ्ट आयडिया ठरतील बेस्ट

SCROLL FOR NEXT