Mahavikas Aghadi Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नसणार; महाविकास आघाडीचा मेगाप्लान, पाहा VIDEO

Maharashtra Vidhan Sabha Election: महाविकास आघाडीने विधानसभेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. सध्या तिन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी यांच्या बैठका सुरू आहेत. अशामध्येच एक मोठी बातमी समोर आली आहे.

Priya More

लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election 2024) चांगले यश मिळवल्यानंतर आता महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) तयारीला लागली आहे. महाविकास आघाडीने विधानसभेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. सध्या तिन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी यांच्या बैठका सुरू आहेत. कुठलीही कसर न सोडता विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) लढवण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आतापासून कंबर कसली आहे. अशामध्ये आता मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय लढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. लोकसभेप्रमाणं विधानसभेला महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाणार आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये निर्णय होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याआधी सुद्धा समसमान जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये खलबतं झाली होती अशा बातम्या समोर आल्या होत्या. ज्याचे जास्त आमदार त्याच पक्षाचा मुख्यमंत्री अशी देखील चर्चा रंगली होती.

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने तब्बल ३० जागांवर विजय मिळवला होता. महाविकास आघाडीच्या यशामुळे महायुतीला चांगलाच धक्का बसला होता. या विजयामुळे आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीने काही दिवसांपूर्वी एकतेचा नारा देत विधानसभेसाठी संयुक्त पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकले होते.

विधानसभेसाठी महाविकास आघाडीने मेगाप्लॅन आखला असल्याचे म्हटले जात आहे. विधानसभेत महाविकास आघाडी एकत्र निवडणुक लढणार आहे. घटकपक्ष आणि इतर सामाजिक संस्थांनाही सहभागी करून घेणार आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांवर देखील लक्ष केंद्रीत करणार आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी सर्व खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख आणि मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची काही दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी सर्वांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT