Ajit Pawar On Sharad Pawar Yandex
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : आंबेडकरी चळवळीतील बडा नेता लवकरच 'तुतारी' फुंकणार; अजितदादांचं टेन्शन वाढणार!

Satish Daud

लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर शरद पवार यांचा कॉन्फिडन्स वाढला आहे. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना शह देण्यासाठी शरद पवार वेगवेगळ्या रणनिती आखत आहेत. समरजित घाटगे यांना पक्षात घेऊन हसन मुश्रीफांसमोर आव्हान उभं केल्यानंतर आता शरद पवारांनी नवा डाव टाकलाय.

सध्या अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे असलेला इंदापूर विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी शरद पवार यांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा रंगली असताना आंबेडकर चळवळीतील बडा नेता शरद पवारांनी आपल्या गळाला लावला आहे. त्यामुळे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणेंसह अजितदादा गटाचं टेन्शन वाढलंय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा चौकशीचे आंबेडकरी चळवळीचे बाजू मांडणारे ॲड राहुल मखरे लवकरच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. येत्या 7 सप्टेंबर रोजी मखरे हे तुतारी फुंकणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात त्यांचा जंगी पक्षप्रवेश होणार आहे. मखरे हे पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील रहिवासी आहेत.

स्थानिक असल्यामुळे इंदापूर तालुक्यात त्यांचा तगडा जनसंपर्क आहे. यापूर्वी त्यांनी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिवपद भूषवलंय. राहुल मखरे यांच्या प्रवेशामुळे इंदापूर तालुक्यात शरद पवार यांची ताकद आणखीच वाढली आहे. दुसरीकडे अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात राहुल मखरे यांनी उमेदवारी मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे, समरजित घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश करताच त्यांचं विधानसभेचं तिकीट फायनल झालं आहे. आता ते मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पक्षप्रवेशानंतर घाटगे सक्रिय झाले असून त्यांनी भूमिका मांडण्यास सुरुवात केली. “कागलमध्ये 100 टक्के परिवर्तन होणार”, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT