Ajit Pawar Maharashtra Cabinet Expansion Saam TV
मुंबई/पुणे

NCP On Mantrimandal Vistar: खातेवाटपाआधीच अजितदादांची डोकेदुखी वाढली? समर्थक आमदार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Ajit Pawar Supporters On Cabinet Expansion: अजित पवार यांच्यासोबत आलेल्या आमदारांचा हिरमोड झाला आहे. अजितदादांसोबत आलेले दोन आमदार अचानक तटस्थ भूमिकेत गेल्याची सूत्रांची माहिती आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन गाड, साम टीव्ही

Maharashtra Political News Today: भाजपने सर्वांना धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाला युती सरकारमध्ये सहभागी करून घेतले. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण, १२ दिवस उलटले तरी सुद्धा या मंत्र्यांना खात्याचं वाटप झालेले नाही. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत आलेल्या आमदारांचा हिरमोड झाला आहे. अजितदादांसोबत आलेले दोन आमदार अचानक तटस्थ भूमिकेत गेल्याची सूत्रांची माहिती आहे.

महामंडळ खात्याच्या अपेक्षेने आलेल्या दोन आमदारांनी तटस्थ भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महामंडळाच्या खात्याची शाश्वती मिळाली, तरच आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असं या आमदारांनी ठामपणे सांगितल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. आमदारांच्या या भूमिकेमुळे अजित पवार (Ajit Pawar) यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी बंड करत युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. अजितदादांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत (NCP) मोठी फूट पडली आहे. अशातच आपल्यासोबत आलेल्या अनेक आमदारांना अजित पवार यांनी काही ना काही आश्वासन दिल्याची माहिती आहे.

पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादीचे अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहे, त्यातच दोन आमदारांनी अजित पवार यांना महामंडळाच्या खात्याने पाठींबा दिला होता. आता या खात्यांवरून तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असल्याने हे दोन्ही आमदार नाराज झाले असून त्यांनी तटस्थ भूमिका घेतल्याची माहिती आहे.

महामंडळाच्या खात्याची शाश्वती मिळाली, तरच आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असं या आमदारांनी ठामपणे सांगितल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. आमदारांच्या या भूमिकेमुळे अजित पवार यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अजित पवार या दोन आमदारांना महामंडळाचे खाते देणार? की त्यांची समजूत काढणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport : सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज! 'या' तारखेपासून सुरू होणार विमानसेवा, मुंबई-गोव्याला काही तासात पोहचणार!

SCROLL FOR NEXT