Cabinet Expansion Formula: मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला? दिल्लीतून आली गुड न्यूज; कुणाला मिळणार मंत्रिपदं?

Maharashtra Cabinet Expansion: मंत्रीपदावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून रस्सीखेच सुरू आहे. अशातच खातेवाटप आणि राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.
Maharashtra Cabinet Expansion Latest Marathi News
Maharashtra Cabinet Expansion Latest Marathi NewsSaam Tv
Published On

Maharashtra Cabinet Expansion Formula: अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन जवळपास १० दिवसांचा कालावधी उलटला. मात्र, अद्यापही नवीन सरकारच्या खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. मंत्रीपदावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून रस्सीखेच सुरू आहे. अशातच खातेवाटप आणि राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार (Cabinet expansion) आज म्हणजेच गुरूवारी पार पडणार आहे. सकाळी ११ वाजता मंत्र्यांचा शपथविधी होईल आणि त्यानंतर खातेवाटप जाहीर केलं जाईल, असं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे.

Maharashtra Cabinet Expansion Latest Marathi News
Abdul Sattar News: मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढणार? न्यायालयाने दिले खटला चालवण्याचे आदेश; काय आहे प्रकरण?

बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळ राज्यातील उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात महत्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे.

शिंदे गटाकडून भरत गोगावले, अनिल बाबर आणि योगेश कदम यांना मंत्रिपदे मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे, तर संजय सिरसाट आणि संजय रायमूलकर यांना तिसऱ्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची कमी शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मागील जवळपास दीड वर्षांपासून राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सातत्याने नवनवीन तारखा दिल्यानंतर अलीकडेच अचानक अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला आहे.

Maharashtra Cabinet Expansion Latest Marathi News
PM Awas Yojana: मुंबईत घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; EWS घटकांच्या उत्पन्न निकषात मोठा बदल

अजित पवार गटाची युती सरकारमध्ये एन्ट्री होताच राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे मागून आलेल्या आमदारांचा आधी शपथविधी झाल्याने शिंदे गटासह (Eknath Shinde) भाजपातील अनेक आमदार नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ विस्ताराचा गुंता आणखी वाढत चालला आहे.

याच पार्श्वभूमीवर बुधवारी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या दोन्ही नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. दिल्लीतील या बैठकीनंतर आज म्हणजेच गुरूवारी सकाळी ११ वाजता राज्याचा उर्वरित मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com