Agriculture Minister Abdul Sattar problems increased giving election commission false affidavit
Agriculture Minister Abdul Sattar problems increased giving election commission false affidavit Saam TV

Abdul Sattar News: मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढणार? न्यायालयाने दिले खटला चालवण्याचे आदेश; काय आहे प्रकरण?

Abdul Sattar News: शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Published on

Agriculture Minister Abdul Sattar News: एकीकडे राज्यातील युती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांनी 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत खोटी माहिती दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

Agriculture Minister Abdul Sattar problems increased giving election commission false affidavit
Maharashtra Cabinet Expansion News: अखेर तिढा सुटला! 'या' दिवशी होऊ शकतो मंत्रिमंडळ विस्तार, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

या प्रकरणी सिल्लोड न्यायालयाने (Sillod Court) सत्तार यांच्यावर लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते महेश शकरलाल शंकरपेल्ली, पुण्यातील डॉ. अभिषेक हरिदास यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती.

याप्रकरणी दीड वर्षे सत्यता पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आता सत्तार यांना न्यायालयात स्वतः हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले, असल्याची माहिती याचिकाकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी दिली.

याचिकेनुसार अब्दुल सत्तार यांनी 2014 व 2019 सिल्लोड व सोयगाव विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या शेतजमीन, व्यापार संकुल, निवासी इमारत याविषयी तसेच आपल्या शिक्षणाच्या संदर्भात खोटी, अपुरी माहिती दिली व आवश्यक ती माहिती लपवली आहे.

Agriculture Minister Abdul Sattar problems increased giving election commission false affidavit
Bharat Gogawale Comment on Aditi Tatkare : युतीत ठिणगी? पालकमंत्रिपदासाठी हपापणे आपल्या स्वभावाला साजेसे, NCPच्या आमदाराची भरत गोगावलेंवर टीका

सत्तार यांच्यावर खोटे प्रतिज्ञापत्र तयार करणे, 26 क्रमांकाचा अर्ज सादर करताना त्यात निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्देशाप्रमाणे माहिती न भरता रकाने रिकामे सोडणे, या गुन्ह्याबाबत याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद मान्य करीत सिल्लोड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मीनाक्षी एम. धनराज यांनी सीआरपीसी कलम 204 अन्वये प्रोसेस इश्यू करण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार चालू असताना अब्दुल सत्तार यांना न्यायालयाचा मोठा झटका मानण्यात येत आहे. याचिकेमध्ये मनोज गंगाराम मोरेल्लु, अजबराव पाटीलबा मानकर हे साक्षीदार आहेत. पुढील कायदेशीर न्यायालयीन लढाई जिंकण्याचा पूर्ण विश्वास याचिकाकर्ते महेश शंकरपेल्ली, डॉ. अभिषेक हरदास यांनी व्यक्त केला आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com