Maharashtra Cabinet Expansion: अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन जवळपास १० दिवसांचा कालावधी उलटला. मात्र, अद्यापही युती सरकारमधील खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही.
मंत्रीपदावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) आणि खातेवाटप नेमकं कधी होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
खातेवाटपाचा तिढा हा सोडवला गेला असून गुरूवारी किंवा शुक्रवारी मंत्र्यांना खातेवाटप केले जाईल, त्याचबरोबर कोणताही विलंब न करा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार देखील लवकरात लवकर पार पाडला जाईल, मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
राज्य सरकारमधील तिन्ही मित्रपक्षांनी खातेवाटपासंदर्भात चर्चा केली असून त्याबाबत कुठेलही मतभेद नाही, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, येत्या १७ जुलैपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेश सुरू होणार आहे. याआधी खातेवाटप आणि मंत्रिमंडळाचा तिसऱ्या टप्प्याचा विस्तार पार पडेल, असंही फडणवीसांनी सांगितलं आहे.
दरम्यान, बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळ राज्यातील उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात महत्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे.
शिंदे गटाकडून भरत गोगावले, अनिल बाबर आणि योगेश कदम यांना मंत्रिपदे मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे, तर संजय सिरसाट आणि संजय रायमूलकर यांना तिसऱ्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची कमी शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.