AAP Will Contest Pune Assembly Election ANI
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: 'आप'चा मोर्चा पुण्याकडे, सर्व जागा लढवणार, मविआला फटका बसणार?

Priya More

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. काही पक्षाचे उमेदवार देखील निश्चित झाले आहेत तर काहींनी उमेदवारांच्या नावाची देखील घोषणा केली आहे. अशामध्ये आम आदमी पार्टीने महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. आपने पुण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. आपकडून पुण्यातील सर्वच्या सर्व जागांवर निवडणूक लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

आम आदमी पार्टी पुणे शहरातील सर्व जागा लढणार आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने विधानसभेसाठी पुणे शहरातील आठही जागांवर उमेदवार देणार आहे. निवडणुकीत पक्षाच्या वतीने उच्चशिक्षित उमेदवार दिले जाणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात सत्तानाट्य, कोयता गँग, महिला अत्याचार, युवा बेरोजगार, शेतकरी आत्महत्या या विषयावर आप विधानसभा निवडणूक लढवणार आहे.

मागच्या महिन्यामध्ये आम आदमी पार्टीने महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याची घोषणा आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. आपकडून उमेदवारी मिळावी यासाठी फक्त पक्षातीलच नाही तर अन्य पक्षातील बरीच नेते मंडळी इच्छुक आहेत.

आम आदमी पक्षाच्या वतीने २५ ऑगस्ट २०२४ रोजी परभणी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला राज्य संघटन मंत्री संग्राम घाडगे पाटील, परभणी जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates: कोल्हापुरात महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Grah Gochar: पुढचे ४ दिवस ४ ग्रहांचं होणार बॅक-टू-बॅक गोचर; 'या' राशींच्या व्यक्ती करणार पैशांची डबल कमाई

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना कार्यक्रमाला जाताना अपघात; २९ महिलांना घेऊन जाणारी एसटी बस ५० फूट दरीत कोसळली

Nashik News : दांडिया खेळण्यावरून तरुणाला बेदम मारहाण; तरुणाची प्रकृती चिंताजनक, घटना सीसीटीव्हीत कैद

Maharashtra Politics: शेतकरी नेते रविकांत तुपकर मातोश्रीवर! 'मविआ'सोबत जाण्याबाबत ठाकरेंशी चर्चा; पडद्यामागे काय घडतंय?

SCROLL FOR NEXT