Raj Thackeray Vs Eknath Shinde 
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप होणार? शिंदे-ठाकरेंमध्ये डिनर डिप्लोमसी, मनसे-शिवसेना युतीची राज्यात चर्चा | VIDEO

Raj Thackeray & Eknath Shinde : राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची मंगळवारी रात्री मैत्रीपूर्ण भेट झाली. त्यानंतर मनसे-शिवसेना युतीच्या चर्चांना उधाण सुरू झाले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांआधी नवे समीकरण जुळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Namdeo Kumbhar

MNS Shiv Sena alliance News Raj Thackeray Eknath Shinde meeting : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी राज्यात नव्या युतीचे संकेत मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेमधील दुरावा संपला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मंगळवारी रात्री भेट झाली. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण जुळणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या दिलेल्या प्रतिक्रियेनंतर मनसे शिसवेना युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. राज ठाकरे यांनी यासाठी एकनाथ शिंदे यांच्यावर थेट आरोपही केले होते. मात्र, आता ही भेटीनंतर कटुता संपली असून ही नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात ठरू शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

भेटीमागील हेतू काय, एकनाथ शिंदे काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही भेट राजकीय नसल्याचं म्हटलं. “ही एक मैत्रीपूर्ण भेट होती. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर, विकासकामांवर आणि इतर विषयांवर चर्चा केली. प्रत्येक भेटीला राजकीय रंग देण्याची गरज नाही,” असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. या भेटीला शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत हेही उपस्थित होते. राज ठाकरे यांनी दिलेल्या स्नेहभोजनाच्या निमंत्रणाला मान दिल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

पुढे काय?

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या या भेटीमुळे महायुतीच्या रणनीतीत बदल होण्याची शक्यता आहे. मनसे आणि शिवसेना यांच्यात युती झाल्यास मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी शिवसेनेला (शिंदे गट) बळ मिळू शकतं. मात्र, ही भेट खरोखरच स्नेहभोजनापुरती मर्यादित होती की युतीच्या दृष्टीने पडताळणी, हे येत्या काळात स्पष्ट होईल. सध्या तरी या भेटीने राजकीय वातावरण तापलं असून तर्कवितर्क लावले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT