Sanjay Raut On Uddhav Thackeray Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री का झाले? संजय राऊत यांनी सांगितलं नेमकं कारण

Priya More

'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ही राजकारणाची तेव्हाची गरज होती आणि महाविकास आघाडीची गरज होती.', असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. १० जागा कमी असल्या तरी मुख्यमंत्रीपद आम्हालाच पाहिजे अशी भूमिका ठाकरे गटाची असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी वन नेशन वन इलेक्शनवरून भाजपवर निशाणा साधला. भाजपला देशात आणि राज्यात पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे वन नेशन वन इलेक्शनसारखे फंडे भाजप आणत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री -

मुख्यमंत्री पदासाठी कमी जागा असल्याबाबतच्या चर्चांवर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, 'या खोट्या बातम्या आहेत. बातम्या देणारे बैठकीला होते का त्यांनी आमची चर्चा ऐकली का? अशा बातम्या होत नाही हे बातमी देणाऱ्याला समजले पाहिजे. अशा चर्चा राजकारणात कधीच होत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ही तेव्हाची राजकारणाची गरज होती आणि महाविकास आघाडीची देखील गरज होती.'

वन नेशन वन इलेक्शन -

वन नेशन वन इलेक्शनला विरोध करत संजय राऊत यांनी सांगितले की, 'काल जी काही वन नेशन वन इलेक्शनची घोषणा केलेली आहे ती २०२९ ची तयारी आहे. जे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊ शकत नाहीत त्यांनी वन नेशन वन इलेक्शनचा फंडा आणावा हा मोठा झोल आहे. प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती आहे. प्रत्येक राज्यातलं वेगळं हवामान आहे. संस्कृती बदलण्याचा हा प्रयत्न आहे. आधी महानगरपालिकेच्या निवडणुका, राज्याच्या निवडणुका एकत्र घेऊन दाखवा. वन नेशन वन इलेक्शन हे लोकशाहीविरोधी आहे. भविष्यात त्यांचा नो इलेक्शनचा नारा असू शकतो. आम्ही सगळे यावर बसून चर्चा करू. इंडिया आघाडीत चर्चा करू.'

पीएम मोदींवर टीका -

संजय राऊत यांनी वन नेशन वन इलेक्शनवरून पीएम मोदींना धारेवर धरले. त्यांनी सांगितले की, 'पीएम मोदी यांना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं. ते अर्थमंत्री कधी झाले. याआधी निवडणूक झालेल्या आहेत. घटनेनुसार याआधी या गोष्टी झालेल्या आहेत त्यांनी नवीन घटना लिहू नये. आमचा वन नेशन वन इलेक्शनला पूर्णतः विरोध आहे. देशाच्या विरोधात असणारी ही कृती आहे. देशाच्या दृष्टीने हे काहीही फायदा नाही. पैसे वाचवायचे आहेत तर देशातली लूट थांबवा. निवडणुकातील खर्च दिसतोय पण लूट दिसत नाही. जागावाटपाची तुमच्याकडे आलेली माहिती चुकीची आहे.'

महाविकास आघाडी बैठक -

'महाविकास आघाडीच्या बैठकीबद्दल बातम्या पेरलेल्या आहेत आणि खोट्या आहेत. एखाद दुसऱ्या जागेवर मतभेद नाहीत दुमत असू शकत पण त्यावर चर्चा होत असते. बंद खोलीतल्या चर्चा बाहेर सांगायच्या नसतात. जागावाटप झाल्यानंतर ते लपून राहणार नाही. ज्यांनी ज्या बातम्या दिलेल्या आहेत ते काय आमच्यासोबत बैठकीला बसले होते का ?' असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, मराठवाडा-विदर्भात जोरदार पाऊस होणार; या जिल्ह्यांना अलर्ट

Rashi Bhavishya today : मनातील भावना जोडीदाराला शेअर कराल; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today : भाग्य फळफळणारा आजचा दिवस, मामाच्या संमिश्र गोष्टी कानावर येतील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

SCROLL FOR NEXT