Assembly Election 2024: मोदी म्हणतात वन नेशन वन इलेक्शन, हरियाणासोबत महाराष्ट्राचं का नाही इलेक्शन?

Pm Narendra Modi and Sharad Pawar: विधानसभेच्या निवडणुकीवरुन विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. एकीकडे लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी एक राष्ट्र- एक निवडणुकीबाबत बोलतात दुसरीकडे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत. अशा शब्दात विरोधकांनी टोला लगावलाय.
मोदी म्हणतात वन नेशन वन इलेक्शन, हरियाणासोबत महाराष्ट्राचं का नाही इलेक्शन?
Pm Narendra Modi and Sharad PawarSaam Tv
Published On

पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा लाल किल्ल्यावरून वन नेशन वन इलेक्शनचा नारा दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगानं जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या. मात्र यातून महाराष्ट्र आणि झारखंडला वगळण्यात आलं. दरवेळी या चार राज्यांच्या निवडणुका सोबत घेतल्या जातात. त्यामुळे विरोधकांना आयतं कोलित मिळालं.

वन नेशन वन इलेक्शनसाठी आग्रह धरणारे पंतप्रधान चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत असा टोला शरद पवारांनी मोदींना लगावलाय. तर मोदी लाल किल्ल्यावरून खोटं बोलत असल्याचा घणाघात संजय राऊतांनी लगावलाय.

मोदी म्हणतात वन नेशन वन इलेक्शन, हरियाणासोबत महाराष्ट्राचं का नाही इलेक्शन?
Maharashtra Politics: बहीण लाडकी, विरोधकांना धडकी? मविआची दुप्पट पैसे देण्याची घोषणा

देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्याने निवडणुकीवरील खर्च कमी होणार आहे. आचारसंहितेमुळे विकासकामांवरही परिणाम होत असल्याचा दावा भाजप वारंवार करतं. जगातील अनेक देशांमध्ये एकाच वेळी निवडणुका होतात

स्वीडनमध्ये, दर चार वर्षांनी सार्वत्रिक निवडणुकांसोबत राज्य आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेतल्या जातात. दक्षिण आफ्रिकेत सार्वत्रिक निवडणुका आणि राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी होतात. ब्राझील, फिलीपिन्स, बोलिव्हिया, कोलंबिया, कोस्टा रिका, ग्वाटेमाला, गयाना आणि होंडुरास या देशांमध्येही एकाचवेळी निवडणुका होतात.

मोदी म्हणतात वन नेशन वन इलेक्शन, हरियाणासोबत महाराष्ट्राचं का नाही इलेक्शन?
Maharashtra Politics: ठाकरेंनी सांगितलं कुणालाही CM करा, संजय राऊत म्हणाले महाराष्ट्राच्या मनात उद्धव ठाकरेच!

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पिछेहाट झाल्यानं महायुतीनं धसका घेतलाय. त्यामुळे निवडणूक लांबवण्याचा घाट घातला जातोय, असा आरोप होतोय. मात्र यामुळे वन नेशन वन इलेक्शनचा नारा देणा-या भाजपला घेरण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com