Ambadas Danve Saam Tv
मुंबई/पुणे

Ambadas Danve Video: पुढच्या वर्धापनदिनी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, अंबादास दानवे यांचं मोठं विधान

Priya More

सचिन गाड, मुंबई

'पुढच्या वर्धापनदिनी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल', असं मोठं विधान शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी मोठं विधान केले आहे. शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाला आले असता माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना अंबादास दानवे यांनी हे विधान केले आहे. यावेळी त्यांनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका देखील केली.

'शिवसेनाप्रमुखांची जी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रातील जनतेने जिला मान्यता दिली आहे आणि स्वीकारले आहे त्या शिवसेनेचा आज वर्धापन दिन आहे. गद्दार लोकांचा हा काय वर्धापन दिन आहे का? आता दीड-दोन वर्षांपूर्वी त्यांचा जन्म झाला आणि ते म्हणतात आमचा ५८ वा वर्धापन दिन आहे.', असा टोला अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

अंबादास दानवे यांनी यावेळी '५९ व्या वर्धापन दिनी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल.', असे मोठ विधान केलं आहे. तसंच, 'त्यांना फक्त २ वर्षे झाली आणि ५८ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. त्यांची गद्दारांची सेना आहे.' असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. तर शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी देखील ठाकरे गटावर टीका केली आहे. 'त्यांचा दुसरा वर्धापन दिन आहे आणि आमचा ५८ वा वर्धापन दिन आहे.'

दरम्यान, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिवस आज साजरा होत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचा वर्धापन दिन सायनच्या षण्मुखानंद हॉलमध्ये साजरा केला जात आहे. थोड्याच वेळामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यक्रम स्थळी पोहचणार आहेत. या वर्धापन दिन कार्यक्रमामधील ठाकरे गटाच्या नेत्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water: रोज नारळ पाणी पिताय तर सावधान! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Marathi News Live Updates : काँग्रेस गरिबाला अजून गरीब करत आहे - PM मोदी

Women's T20 WC: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! लाजिरवाण्या पराभवानंतर स्पर्धेतून बाहेर पडण्याचं संकट ; पाहा Points Table

Chandrapur School Bus Accident : विद्यार्थांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली, बसमध्ये होते ६० विद्यार्थी

Vastu Tips for Sleeping: झोपतेवेळी बेडजवळ चुकूनही ठेऊ नयेत 'या' गोष्टी; गरीबी पाठ सोडणार नाही!

SCROLL FOR NEXT