Shivsena Foundation Day: 58वा वर्धापन दिन; एकमेकांवर डागणार टीकेच्या तोफा, भाषणांकडे सर्वांचं लक्ष, बघा Video

Shiv Sena Meeting 58th Foundation Day Celebration Video: शिंदे यांची शिवसेना वरळी डोम येथे शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन साजरा करत आहे. डोम येथे मोठं शक्तीप्रदर्शन करत शिंदें सेना दम भरलाय. तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात साजरा केला जातोय.
Shivsena Foundation Day: 58वा वर्धापन दिन; एकमेकांवर डागणार टीकेच्या तोफा, भाषणांकडे सर्वांचं लक्ष, बघा Video
Shivsena Foundation Day

मुंबई : आज शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आहे. 58 वर्षे झालेल्या या शिवसेनेत दोन गट निर्माण झालेत. पक्षात फुट पडल्यानंतर हा दुसरा मेळावा असणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे, दुसरीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना हा आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करत आहे. तर षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाच्या शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जात आहे.

दोन्ही सेनेतील नेत्यांच्या भाषणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील वर्धापनदिनी फुट का पडली याच्या आरोप-प्रत्यारोप करण्यात आली होती. आता फुट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीला दोन्ही गट सामोरे गेले आहेत. त्यात शिंदेंनी १५ जागा लढवत ७ जागा जिंकल्यात. त्यामुळे यंदाच्या वर्धापन दिनाच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना वर्धापन दिनाला ३ प्रमुख नेत्यांची भाषणं होणार आहेत. तर केंद्रीय मंत्री - प्रतापराव जाधव, शिवसेना नेते - रामदास कदम, मुख्यमंत्री - एकनाथ शिंदे यांची भाषणं होणार आहेत. त्याआधी लोकसभेत विजयी झालेल्या खासदारांचा सत्कार केला जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com