Uddhav Thackeray on Eknath Shinde and Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीचरणी गहाण टाकलाय; वाघनखांची उठाठेव कसली करताय, 'सामना'तून जहरी टीका

Maharashtra Political News : लंडनहून महाराष्ट्रात आणलेली वाघनखे असली की नकली, यावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहे.

Satish Daud

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी जी वाघनखे वापरली होती. ती वाघनखे महायुती सरकारने महाराष्ट्रात आणली आहे. मात्र, वाघनखे असली की नकली, यावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून महायुती सरकारवर टीका करण्यात आली आहे.

"राज्य सरकारने वाघनखे आणली आहेत. ही वाघनखे ऐतिहासिक खरी, असा दावा तुम्ही करत आहात. पण अफझल खानाचा वध करण्यासाठी शिवरायांनी वापरलेली वाघनखे ती हीच का? याबाबत इतिहास संशोधकांच्या मनात शंका आहे. लंडनच्या ज्या म्युझियममधून ही वाघनखे महाराष्ट्रात आणली त्या म्युझियमला ही वाघनखे छत्रपती शिवरायांचीच याबाबत खात्री नाही", असं सामनाच्या अग्रलेखातून मांडण्यात आलंय.

"मुळात वाघनखे नकली असे कोणीच म्हणत नाही, पण ‘चोरांच्या मनात चांदणे’ तसे मिंधे-फडणवीसांचे झाले आहे! ही वाघनखे खरेच शिवरायांनी वापरलेली आहेत काय? असा प्रश्न इंद्रजित सावंत यांच्यासारख्या इतिहास संशोधकांनी विचारला. सावंत यांनी त्यांच्या शंकेला पूरक असे पुरावे लोकांसमोर मांडले. त्यात मिंधे-फडणवीस यांना मिरच्या झेंबायचे कारण काय?" असा सवालही सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला.

"पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या लोकांनी मागच्या निवडणुकीत शिवरायांचा वापर केला. शिवरायांच्या बरोबरीने मोदींचे फोटो छापले. आता शिवराय आणि श्रीराम मागे पडले. मोदी, मिंधे, फडणवीस आता ‘वाघनखां’ची हवा उठवून महाराष्ट्राच्या भावनांचा अपमान करीत आहेत. वाघनखांचे निमित्त करून छत्रपती शिवरायांच्या नावाने आपले राजकीय नाणे वाजवू पाहत आहेत. हे क्लेशदायक आहे", असा घणाघातही सामना अग्रलेखातून करण्यात आला.

मुळात ज्या राज्यकर्त्यांनी शिवरायांच्या महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीचरणी गहाण टाकला आहे व जे रोज उठून दिल्लीस मुजरे झाडत आहेत त्यांना शिवरायांच्या वाघनखांची उठाठेव करण्याचा नैतिक अधिकार उरला आहे काय? मिंधे-फडणवीस, अजित पवार हे नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवराय आणि अमित शहा यांना संभाजीराजे समजत आहेत, पण महाराष्ट्र हा खऱ्या शिवरायांचा भक्त आहे, असंही सामना अग्रलेखात मांडण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT