Shivsena Sanjay Raut vs Eknath Shinde Group Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut : संजय राऊतांची शिंदे गटावर जहरी टीका, म्हणाले हे ४० दगड बुडून..,

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. पावसाळ्यात गांडूळ जन्माला येतो आणि पाऊस संपला की निघून जातो, शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे... शिंदे मिंथे काही नाही, अशी टीका संजय राऊतांनी शिंदे गटावर केली. (Maharashtra Political News)

शिवसेना एकच आहे दुसरी शिवसेना महाराष्ट्रात नाही, असंही ते म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन आणि दैनिक ‘सामना’चा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आज शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ), आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना (ठाकरे गट) नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना संपवण्याचे काम देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहेत. आपण त्यांना पुरून उरल्याशिवाय राहणार नाही रक्त, प्राण, बलिदान यातून आपला पक्ष उभा राहिला आहे. पावसाळ्यात गांडूळ जन्माला येतो पाऊस संपला की गांडूळही दिसत नाही. महाराष्ट्र म्हटला की उद्धव साहेब आणि बाळासाहेब, शिवसेना एकच आहे दुसरी शिवसेना निर्माण होणार नाही, असं संजय राऊतांनी (Sanjay Raut) ठणकाऊन सांगितलं आहे.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, आपलं सरकार सत्तेत आलं तेव्हा तीन चाकी सरकार आहे असं काहीजण म्हणत होते. पण आता चौथ चाक लागलं आहे, आणि दोन स्टेफन्या देखील तयार आहेत. आम्ही दगडच आहोत. पण बाळासाहेबांनी आमच्यावर सिंधूर थापलं. शिवसेनेशी गद्दारी करणारे हे ४० दगड (शिंदे गटातील आमदार) गाळात गेल्याशिवाय राहणार नाहीत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट! 'मिसिंग लिंक' या दिवशी सुरू होणार, महत्त्वाची अपडेट समोर

Ganesh Chaturthi 2025: तुमच्याही घरी गणपती बसणार आहे? बाप्पाची मूर्ती आणताना 'या' 7 नियमांचं पालन अवश्य करा

भाजप आमदारावर डॉक्टरला मारल्याचा आरोप, क्षुल्लक कारणावरून दादागिरी; परिसरात खळबळ

Nagpur : गावाला जाताना काळाचा घाला, कुलगुरू अन् पत्नीचा जागेवरच मृत्यू, कारचा चक्काचूर

Maharashtra Live News Update: शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

SCROLL FOR NEXT