Milind Deora Saam Tv
मुंबई/पुणे

Milind Deora News : मिलिंद देवरांचा पक्षप्रवेश दिल्लीतून ठरला, CM एकनाथ शिंदेंना माहितीही नव्हती; सूत्रांची माहिती

Maharashtra Political News : काँग्रेसकडून मिलिंद देवरा येथून निवडणूक लढण्यास इच्छूक होती. मात्र ठाकरे गटाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने मिलिंद देवरा यांनी अखेर धक्कादायक निर्णय घेतला.

प्रविण वाकचौरे

Political News :

मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि काँग्रेसला मोठा धक्का दिला. मात्र या पक्षप्रवेशानंतर पडद्यामागे नेमकं काय घडलं याबाबत अनेक गोष्टी सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहेत. मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. मात्र मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय दिल्लीतून झाल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत माहिती देखील नव्हती.

दक्षिण मुंबईची जागा कुणी लढवायची याबाबत महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु होती. विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यासाठी ठाकरे गटाने या जागेवर दावा केला होता. तर काँग्रेसकडून मिलिंद देवरा येथून निवडणूक लढण्यास इच्छूक होती. मात्र ठाकरे गटाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने मिलिंद देवरा यांनी अखेर धक्कादायक निर्णय घेत, महाविकास आघाडीला आव्हान देण्याची शक्यता आहे. सरकारनामाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिंदे गटाकडून या जागेसाठी यशवंत जाधव किंवा आमदार यामिनी जाधव यांचा विचार सुरू होता. मात्र दिल्लीतून सूत्र फिरली आणि शिंदेंना देवरा यांना पक्षात घ्यावे लागले. मिलिंद देवरा यांच्या प्रवेशानंतर दक्षिण मुंबईतून तेच महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे.  (Latest Marathi News)

मिलिंद देवरा थेट भाजपमध्ये का गेले नाहीत?

दक्षिण मुंबई हा मतदारसंघ मागील दोन टर्म शिवसेनेकडे आहे. त्यामुळे महायुतीत जागावाटपावरुन वाद टाळण्यासाठी भाजपने सामजस्यांची भूमिका घेतली असावी. याशिवाय जर मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश दिल्लीतून झाला असेल तर उमेदवार जरी शिवसेनेचा असला तरी भाजपच्या जवळचा असेल, ही बाब महत्त्वाची आहे.

ठाकरे गटाशी साधला होता संपर्क?

मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याआधी ठाकरे गटाशी संपर्क साधला होता. दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभेच्या उमेदवारी मागणी देवरा यांनी केली होती, असा मोठा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला. मात्र उद्धव ठाकरे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्या पाठीशी उभे राहिले, असं राऊत यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balaji Kinikar News : माझ्या विजयाचं श्रेय मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेला, आमदार बालाजी किणीकरांनी व्यक्त केली भावना

IPL 2025 Mega Auction Live: RCB चा शिलेदार पंजाबच्या ताफ्यात! मॅक्सवेलवर लागली अवघ्या इतक्या कोटींची बोली

IPL 2025 Mega Auction: लॉस झाला ना भावा! स्टार्कला मिळाली ५० टक्क्याहून कमी रक्कम; कोणत्या संघाने लावली बोली?

Maharashtra News Live Updates: नव्या सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता

Sharad Pawar : मी घरी बसणारा नाही; विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी सांगितला पुढील प्लान

SCROLL FOR NEXT