shinde Government news  saam tv
मुंबई/पुणे

शिंदे-फडणवीस सरकारने आखली नवी रणनीती; राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार ?

ज्यातील राजकीय समीकरण बदलल्यानंतर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या (MLC) नावावर आज रात्री शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १२ आमदारांची यादी मंजूर न केल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी राज्यपालांना लक्ष्य केले होते. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही राज्यपालांंवर अनेकदा टीका केली होती. दरम्यान, शिंदे गटाच्या बंडाळीनं राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे. राज्यातील राजकीय समीकरण बदलल्यानंतर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या (MLC) नावावर आज रात्री शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ( Maharashtra Political News In Marathi )

राज्यात महाविकास सरकार असताना राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात अनेकदा संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार विराजमान होताच आता राज्यपालांकडून १२ आमदार नियुक्त आज रात्री शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेत १२ आमदार वाढविण्याची शिंदे सरकारने तयारी केली आहे. राज्यपालांकडून १२ आमदार नियुक्त केल्यानंतर विधान परिषद सभागृहात शिंदे गट-भाजप युतीचे संख्याबळ वाढणार आहे. राज्यपालांच्या १२ आमदारांच्या नियुक्तीनंतर क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सदस्यांची परिषदेत वाढ होणार आहे. नियुक्तीनंतर भाजपचे ८ आणि शिंदे गटाचे ४ सदस्य हे आमदार होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, येत्या डिसेंबरमध्ये विधान परिषदेचे सहा सदस्य निवृत होणार आहे. त्यांनाही पावसाळी अधिवेशनात निरोप दिला जात आहे. यामध्ये काँग्रेसचे आमदार अमर राजुरकर, राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले, काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम, भाजपचे आमदार परिणय फुके, भाजपचे आमदार चांदुभाई पटेल तर शिवसेनेचे आमदार दुष्यंत चतुर्वेदी हे येत्या डिसेंबरमध्ये निवृत्त होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT