Shinde Group Mla Contect to Uddhav Thackeray: अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे गटाच्या आमदारांची कोंडी झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गटातील (Eknath Shinde) आमदारांमध्ये नाराजीचे सूर उमटत असल्याचं समजतंय. त्यातच आता शिंदे गटातील काही आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
त्यामुळे राज्यात पुन्हा एक राजकीय भूकंप होणार, अशा चर्चांनी जोर धरला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटातील ७ ते ८ आमदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत संपर्क साधला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला आमचा विरोध होता, म्हणून आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो होतो, आता आम्हाला परत यायचं आहे, आम्हाला परत पक्षात घ्या, अशी विनवणी शिंदे गटातील आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी शिंदे भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रचंड अस्वस्थता पसरल्याची माहिती आहे. भाजपने राष्ट्रवादीला सत्तेत घेतल्यानंतर शिंदे गटातील आमदार नाराज झाल्याची चर्चा आहे.
इतकंच नाही, तर मंत्रिपदासाठी (Maharashtra Politics) आमदारांमध्ये बाचाबाची देखील झाल्याची माहिती आहे. यातून आता काही नाराज आमदारांनी उद्धव ठाकरे यांना संपर्क साधला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे या आमदारांना परत घेतील का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
विशेष बाब म्हणजे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा शिंदे गटातील १७ ते १८ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. इतकंच नाही, तर आज देखील ४ आमदारांनी मला संपर्क साधला आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या गटात सुद्धा मोठी फुट पडणार का? हे येणाऱ्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.