Eknath Shinde reaction on MNS Shiv Sena Thane Rada Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : मनसे-ठाकरे गट राड्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले वाचा...

Eknath Shinde reaction on MNS Shiv Sena controversy : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवला होता. त्याच ॲक्शनची ही रिएक्शन आज पाहायला मिळाली", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Satish Daud

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने शनिवारी ठाणे शहरातील गडकरी सभागृहात मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक महत्वांच्या नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी नारळ आणि बांगड्या फेकल्या.

त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून ठाण्यातील राजकीय वातावरण रात्रभर तापलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 46 मनसैनिकांवर (MNS News) गुन्हे दाखल केले आहेत. अजूनही मनसेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड केली जातेय. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या राड्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मनसे-ठाकरे गट राड्यानंतर शिंदेंची प्रतिक्रिया

ठाणे शहरातील मनसे आणि ठाकरे गटात झालेल्या राड्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. "खरं तर या राड्याची सुरुवात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दौऱ्यात झाली होती. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवला होता. त्याच ॲक्शनची ही रिएक्शन आज पाहायला मिळाली. मी अशा घटनांचं समर्थन करत नाही", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

"मर्द असाल तर समोर या, पळून का गेलात?"

ठाण्यातील राड्यानंतर ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) नेते आक्रमक झाले असून मनसेवर घणाघाती टीका करीत आहेत. ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे यांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्लाबोल केलाय. मर्द असाल तर समोर या, पळून का गेलात? असा संताप राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे.

ठाकरे गट आणि मनसे राड्यानंतर माध्यमांशी बोलताना राजन विचारे म्हणाले की, आज महिलांना पुढे करून जो प्रकार घडला, तो अतिशय निंदनीय आहे. बीडला झालेल्या घटनेचं समर्थन नव्हतंच. राड्यानंतर मनसे कार्यकर्ते पळून गेले. त्यांच्यात सामना करण्याची हिंमत नव्हती, असं देखील राजन विचारे म्हणाले.

राज ठाकरेंनी मनसैनिकांना केला व्हिडीओ कॉल

ठाण्यातील राड्यानंतर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली. रात्रभरातून 46 मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी राज ठाकरे यांनी थेट व्हिडीओ कॉल करत कार्यकर्त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांचं व्हिडीओ कॉलवरून कौतुक देखील केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; २२ उपजिल्हाधिकाऱ्यांची बढती होणार

Maharashtra Politics: पंढरपुरमध्ये CM फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक, ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर

क्रिकेट खेळताना भयंकर घडलं, पोटाला बॅट लागली अन् जागीच कोसळला, १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Crime News: ५ कोटींची रोख रक्कम, दीड किलो सोनं, आलिशान कार अन्... पोलिस अधिकाऱ्याच्या घरात सापडलं घबाड

Akshay Kumar: डीपफेक व्हिडीओ प्रकरणात अक्षय कुमारला दिलासा; हायकोर्टाने दिले महत्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT