Devendra Fadnavis News, Dhananjay Munde News Saam TV
मुंबई/पुणे

मोठी बातमी! धनंजय मुंडे मध्यरात्री फडणवीसांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

फडणवीसांच्या सागर बंगल्यावर मध्यरात्री ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Satish Daud

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याला अखेर पूर्णविराम मिळाला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात नवीन सरकार सत्तेत आलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, फडणवीस पुन्हा सत्तेत येताच राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर मध्यरात्री ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Dhananjay Munde Latest News)

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे फडणवीसांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर गेले असल्याची माहिती आहे. एवढंच नाही तर, देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा देखील झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर अचानक धनंजय मुंडे यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी सागर बंगल्यावर गेल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी एका वृत्त वाहिनीशी केला आहे. धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट होती का, या भेटीत उद्याच्या राजकारणाची काही बीजे रोवली गेली आहेत का हे येणाऱ्या काळात कळेल. (Devendra Fadnavis Latest News)

नव्या सरकाविरोधात शिवसेना कोर्टात

महाराष्ट्रात स्थापन झालेल्या नव्या सरकारविरोधात शिवसेनेनं कोर्टात धाव घेतली आहे. कालचा शपथविधी बेकायदेशीर असल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे. एवढंच नाही तर बहुमत चाचणी पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. निलंबनाची नोटीस बजावलेल्या आमदारांना बहुमत चाचणी करण्याची परवानगी देऊ नका असं याचिकेत मांडण्यात आलं आहे. (Eknath Shinde Latest News)

राज्यात नवं सरकार आल्यानंतर शिवसेनेकडून याविरोधात सर्वोच्च न्यायालयात यासंबंधीची याचिका नुकतीच दाखल करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यपालांनी शनिवारी आणि रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांना विश्वासमत सिद्ध करावे लागणार आहे. या दरम्यानच विधानसभा अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईच्या याचिकेवर 11 जुलै रोजी होणारी सुनावणी आजच करावी अशी मागणी शिवसेनेकडून सु्प्रीम कोर्टात करण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: १४.३% वाढ की १४०% पगारवाढ? ₹६९ हजार पगाराचा आकडा चर्चेत कसा आला? जाणून घ्या...

Maharashtra News Live Update: CJP नेते सौरव दास आणि आशुतोष रांका प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचा सवाल; तातडीच्या सुनावणीवर प्रश्नचिन्ह

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारासाठी दसरा ठरला निरस; सोन्याचे भाव घसरूनही उलाढालीत १५ टक्क्यांची घट; आजचे दर किती?

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT