Maharashtra Political Crisis | कालचा शपथविधी बेकायदेशीर? नव्या सरकाविरोधात शिवसेना कोर्टात

महाराष्ट्रात स्थापन झालेल्या नव्या सरकारविरोधात शिवसेनेनं कोर्टात धाव घेतली आहे.
Maharashtra Political Crisis| Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Maharashtra Political Crisis| Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSaam TV
Published On

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, महाराष्ट्रात स्थापन झालेल्या नव्या सरकारविरोधात शिवसेनेनं कोर्टात धाव घेतली आहे. कालचा शपथविधी बेकायदेशीर असल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे. एवढंच नाही तर बहुमत चाचणी पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. (Shivsena Latest News)

Maharashtra Political Crisis| Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
ठाकरेंना मोठा धक्का! सरकारमध्ये येताच फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय

राज्यात नवं सरकार आल्यानंतर शिवसेनेकडून याविरोधात सर्वोच्च न्यायालयात यासंबंधीची याचिका नुकतीच दाखल करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यपालांनी शनिवारी आणि रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांना विश्वासमत सिद्ध करावे लागणार आहे.

या दरम्यानच विधानसभा अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईच्या याचिकेवर 11 जुलै रोजी होणारी सुनावणी आजच करावी अशी मागणी शिवसेनेकडून सु्प्रीम कोर्टात करण्यात आली आहे.

Maharashtra Political Crisis| Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
CM of Maharashtra : …मग तेव्हा मुख्यमंत्रीपदावरून युती का तोडली?; शिवसेनेचा भाजपला थेट सवाल

शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या नोटिशीविरोधात काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 11 जुलै रोजी याबाबत पुढील सुनावणी करणार असल्याचे सांगितले. त्याशिवाय, अपात्रतेची नोटिस बजावलेल्या आमदारांना 12 जुलैपर्यंत नोटिशीला उत्तर देण्यास सांगितले होते.

याचिकेत काय म्हटलं आहे?

दरम्यान, शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत 16 आमदारांवरील निलंबनाची कारवाई संदर्भातील याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे निलंबनाची नोटीस बजावलेल्या आमदारांना बहुमत चाचणी करण्याची परवानगी देऊ नका असं याचिकेत मांडण्यात आलं आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी ही याचिका दाखल केली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होणार असून आता सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय देतं, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com