Shivsena, supreme Court Saam Tv
मुंबई/पुणे

Shivsena : निकाल आमच्या बाजूने लागला तर काय होणार? ठाकरे गटाची कोर्टात विचारणा

आमचीच शिवसेना खरी, असा मुद्दा शिंदे गटाकडून मांडण्यात आला. यावर ठाकरे गटाचे वकिल कबिल सिब्बल यांनी मूळ शिवसेना तुमची मग व्हिपचं पालन का केलं नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra) आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी सुरू आहे. सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची, या मुद्द्यांवरून घटनापीठासमोर दोन्ही गटातील वकिलांचा युक्तीवाद सुरू आहे. शिंदे गटाकडून वकिल नीरज कौल तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल युक्तीवाद करत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाला कोर्टासमोर रोखठोक प्रश्न विचारले आहे. (Shivsena News Supreme Court)

आमचीच शिवसेना (Shivsena) खरी, असा मुद्दा शिंदे गटाकडून मांडण्यात आला. यावर ठाकरे गटाचे वकिल कबिल सिब्बल यांनी मूळ शिवसेना तुमची मग व्हिपचं पालन का केलं नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. शिंदे गटाने पक्ष सोडला नव्हता तर मग व्हिपचं पालन का केलं नाही अशी विचारणाही सिब्बल यांनी म्हटलं आहे.

'घटनापीठासमोर प्रकरण आणण्याची स्थिती निर्माण केली गेली असं कपिल सिब्बल कोर्टासमोर सांगितलं आहे. सगळ्या गोष्टी २० जूनला सुरू झाल्या. २१ जूनला आमदारांची बैठक बोलावण्यात आली. ज्यात अनेक आमदार आले नाही, ते गुवाहाटीला गेले'. असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Politics News Today)

शिंदे गटाला विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी घटनापीठासमोर सांगितलं आहे. आपला वेगळा गट आहोत असं ते सांगू शकत नाहीत. त्यांच्याकडे १० व्या अनुसूचीनुसार, विलीनीकरणाचा एकमेव पर्याय आहे. असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आज निवडणूक आय़ोगाने कार्यवाही केली आणि सर्व याचिकांचा निर्णय आमच्या बाजूने लागला तर काय होणार? अशी विचारणा देखील कपिल सिब्बल यांनी खंडपीठाला केली आहे.

दुसरीकडे ठाकरे गटाचे दुसरे वकिल अभिषेक मनुसिंघवी यांनी देखील जोरदार युक्तीवाद केला. शिंदे गटाला अपात्र घोषित केलं जाण्याची शक्यता असून ते बहुमताच्या आधारे गट स्थापन कसा काय करु शकतात? हे घोड्याच्या पुढे गाडी ठेवण्यासारखे आहे. न्यायालयाकडून अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोग प्रतीक्षा का करू शकत नाही का? असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dalimb Benefits: हिवाळ्यात रोज डाळिंब खाल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Live News Update:पुणे महापालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर

अंधेरी रेल्वे स्थानकावर वृद्ध व्यक्तीकडून मुलीचं धर्मांतर? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? पोलिस म्हणाले...

8th Pay Commission: १ कोटी कर्मचाऱ्यांना बसणार फटका; महागाई भत्ता, HRA आणि ट्रॅव्हल अलाउंस होणार बंद? नेमकं कारण काय?

Dharmendra Health Update: ८९ वर्षीय धर्मेंद्र यांची प्रकृती कशी आहे? ८ दिवसांनी आली हेल्थ अपडेट

SCROLL FOR NEXT