Maharashtra Political Crisis Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Political Crisis: 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात प्रक्रियेला वेग; राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय!

Rahul Narvekar News: विधानसभा अध्यक्षांची विधीमंडळाऐवजी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे धाव

Shivani Tichkule

Political News: राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे. अपात्र आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यानंतर आता आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रक्रियेला वेग आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, आता पक्षाची घटना दोन्ही गटांकडून मागवण्याऐवजी थेट निवडणूक आयुक्तांकडून मागवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. जुलै 2022 मध्ये नोंदवण्यात आलेल्या पक्षाची घटना विधीमंडळ मागवणार आहे. त्यानुसार आता खरी शिवसेना (Shivsena) कोणाची याबाबत लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं की, एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय लवकरात लवकर घेऊ. निर्णय घेताना कुठलाही विलंब होणार नाही. घाई होणार नाही' असे विधान केले होते. त्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  (Political News)

आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही गटाकडून पक्षाची घटना मागवली जाणार आहे. यावेळी पक्ष घटनेनुसार चालतो की नाही हे देखील तपासलं जाणार आहे आणि त्यानंतरच योग्य निर्णय घेतला जाईल. मात्र आता पक्षाची घटना दोन्ही गटांकडून मागवण्याऐवजी थेट निवडणूक आयुक्तांकडून मागवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिवसेना हा राजकीय पक्ष नेमका कोणाचा? याकडे आता सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT