Maharashtra Police Officers Transfer News Saam TV
मुंबई/पुणे

Police Officers Transfer: राज्याच्या पोलिस खात्यात मोठी खांदेपालट; तब्बल १९ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Police Officers Transfer News: राज्याच्या पोलिस खात्यात पुन्हा एकदा मोठी खांदेपालट करण्यात आली आहे. एकाच वेळी तब्बल १९ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.

Satish Daud

Maharashtra Police Officers Transfer News

राज्याच्या पोलिस खात्यात पुन्हा एकदा मोठी खांदेपालट करण्यात आली आहे. एकाच वेळी तब्बल १९ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार अधिकारी यांचा देखील समावेश आहे. दोषी यांची राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागात बदली करण्यात आली आहे.

जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केल्यानंतर तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. मात्र, आता त्यांची थेट गुन्हे अन्वेषण विभागात बदली करण्यात आली आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला प्रश्न देखील विचारला आहे.

तुषार दोषी यांना पोलीस दलात बढती देऊन, राज्य सरकारने त्यांना मराठ्यांवर लाठीहल्ला केल्याचं बक्षीस दिलं आहे का? असा खोचक सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे पुणे सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांची नागपूर येथे नागरी हक्क संरक्षण विभागात पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

  • विशाल सिंगुरी, पोलिस अधीक्षक- नक्षल विरोधी अभियान (पोलिस अधीक्षक- अमरावती ग्रामीण).

  • संजय बारकुंड, पोलिस अधीक्षक धुळे (पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक).

  • श्रीकांत धिवरे, पोलिस अधीक्षक लोहमार्ग पुणे (पोलिस अधीक्षक धुळे).

  • प्रीतम यावलकर, पोलिस अधीक्षक, सायबर मुंबई (अतिरिक्त अधीक्षक, सोलापूर ग्रामीण).

  • कविता नेरकर, अतिरिक्त अधीक्षक अंबाजोगाई (पोलिस अधीक्षक सायबर मुंबई)

    .

  • दिनेश बारी, पोलिस अधीक्षक सीआयडी (पोलिस अधीक्षक फोर्स वन मुंबई).

  • गणेश शिंदे, अतिरिक्त अधीक्षक लोहमार्ग पुणे (पोलिस उपायुक्त अमरावती).

  • अनुज तारे, अतिरिक्त अधीक्षक गडचिरोली (पोलिस अधीक्षक वाशीम).

  • नवनीत कुमार कॉवत, अतिरिक्त अधीक्षक धाराशिव (पोलिस उपायुक्त छत्रपती संभाजीनगर).

  • मोक्षदा पाटील, पोलिस अधीक्षक लोहमार्ग, छत्रपती संभाजीनगर (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल-८ मुंबई).

  • अशोक बनकर, अतिरिक्त अधीक्षक गोंदिया (प्राचार्य पोलिस प्रशिक्षण केंद्र जालना).

  • माधुरी केदार, अतिरिक्त अधीक्षक नाशिक ग्रामीण (अतिरिक्त अधीक्षक लोहमार्ग पुणे).

  • चंद्रकांत गवळी, अतिरिक्त अधीक्षक जळगाव (प्राचार्य गुप्तचर प्रशिक्षण शाळा, नाशिक).

  • हिम्मत जाधव, अतिरिक्त अधीक्षक सोलापूर ग्रामीण (पोलिस उपायुक्त मुंबई).

  • शशिकांत सातव अतिरिक्त अधीक्षक अमरावती (पोलिस उपायुक्त नागपूर).

  • अशोक नखाते, प्राचार्य (अतिरिक्त अधीक्षक जळगाव).

  • विक्रम साळी, पोलिस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण नाशिक (अतिरिक्त अधीक्षक अमरावती ग्रामीण) .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT