MNS Raj Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray : पाकिस्तानी चित्रपटाच्या प्रदर्शनावरून मनसे आक्रमक, राज ठाकरेंनी थेट इशाराच दिला

MNS Raj Thackeray: 'लिजेंड ऑफ मौला जट' हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला मनसेने विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत थेट इशारा दिला.

Priya More

पाकिस्तानी चित्रपटावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आक्रमक झाला आहे. 'लिजेंड ऑफ मौला जट' हा पाकिस्तानी चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. यावरून मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊन देणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, 'लिजेंड ऑफ मौला जट' नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात? आणि कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे, पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही.'

'हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरु आहे? महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे. अर्थात बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही, हे नक्की.' असं राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.

पाकिस्तानी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ नये यासाठी राज ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, 'या आधी असे प्रसंग जेंव्हा आले होते तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे थिएटर मालकांना सध्या तरी नम्रपणे आवाहन आहे की उगाच सिनेमा प्रदर्शित करण्याच्या भानगडीत पडू नका. हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरु होणार आहे. अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार.'

तसंच, 'उगाच संघर्ष आम्हाला पण नको आहे. त्यामुळे वेळीच पाऊलं उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पहावं. मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या, तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये. कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे.', असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसणं महत्वाचं आहे - उद्धव ठाकरे

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT