Maharashtra Cabinet Saam Tv News
मुंबई/पुणे

Maharashtra Government: महाराष्ट्रातील मंत्र्यांचे टेन्शन वाढलं, परफॉर्मन्स ऑडिट होणार; नेमकं कारण काय?

Maharashtra Cabinet: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या मंत्रिमंडळात सध्या कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र मंत्राच्या कामाचं ऑडिट करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Ganesh Kavade

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या मंत्रिमंडळात सध्या कोणत्याही प्रकारचा बदल होणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र महायुतीच्या सर्व मंत्राच्या कामाचं ऑडिट सुरू केले जाणार आहे. या ऑडीटला आतापासूनच सुरूवात झाली असल्याचे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

अडीच वर्षानंतर गुजरात सरकारमध्ये मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेत नवीन मंत्रिमंडळ स्थापन केले. त्यानंतर लगेच महाराष्ट्रात देखील अशाच पद्धतीने काही होणार का? अशा चर्चांना उधाण आले होते. कारण गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मंत्र्यांना अडचणीला सामोरे जावे लागले होते. त्यातच एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला होता.

त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात धक्के बसतील अशा पद्धतीच्या चर्चा सुरू असतानाच याला कुठे तरी पूर्णविराम मिळाला. मंत्रिमंडळात बदल न होता सध्या मंत्र्यांच्या कामाचं परफॉर्मन्स ऑडिट करण्यात येणार आहे. त्यामुळे तुर्तास तरी दिलासा असला तरी मंत्र्यांचे टेन्शन कायम डोक्यावर पाहायला मिळणार आहे.

त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वत:च्या मतदारसंघासोबतच पालकमंत्रिपद दिलेला जिल्हा या सर्वच ठिकाणी स्वत:ची ताकद आणि किमया मंत्र्यांना दाखवावी लागणार आहे. नाही तर या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार हे जवळपास निश्चत झाले आहे. सध्या फडणवीस सरकारच्या मंत्र्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ जवळपास पूर्ण होत आहे.

त्यामुळे याच कार्यकाळातील निर्णय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसंच १०० दिवसांचा कार्यक्रम त्यानंतर लगेच १५० दिवसाचा कार्यक्रम हे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या व्हिजनसाठी मंत्र्यांना आगोदरच आखून दिले आहेत. त्यामध्ये काही विभागांतील उत्तम काम करणाऱ्या विभागाचा सत्कार करण्यात आला. तर काहींना आणखी सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे अशा या सर्व कामांचा ऑडिटच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

Daily Walking: दररोज फक्त इतकंच चाला, राहाल फिट अँड फाइन; ढिगभर फायदे आणि आयुष्यही वाढेल

Konkan Food : कोकणात बनवतात तशी चमचमीत 'वालाची आमटी', गरमागरम भाताची चव वाढवेल

CM फडणवीसांच्या सभेआधी गोळीबार, भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर ४ राऊंड फायर, CCTV व्हिडिओ व्हायरल

Grahan Dosh: 2026 नव्या वर्षात या राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर; सूर्य-राहूचा अशुभ ग्रहण योग ठरणार धोकादायक

SCROLL FOR NEXT