चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीविरोधात उद्योजक, कामगार आणि नागरिक रस्त्यावर उतरले आहेत
हा मोर्चा PMRDA कार्यालयाकडे मार्गस्थ झाला आहे
वाहतूक कोंडीमुळे उद्योजकांना मोठा फटका बसत आहे
प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात उद्योजक आक्रमक झाले आहेत
पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. या वाहतूक कोंडीचा फटका मोठ्या प्रमाणावर उद्योजकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर उद्योजक आणि पुणेकर या वाहतूक कोंडीविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. हा मोर्चा आज पुणे-नाशिक महामार्गावरून आकुर्डी येथील PMRDA कार्यालयाकडे मार्गस्थ झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर उद्योजकांनी थेट रस्त्यावर उतरून आवाज उठवला आहे. चाकणमधील उद्योजक, कामगार आणि स्थानिक नागरिकांचा मोठा मोर्चा आज पुणे-नाशिक महामार्गावरून आकुर्डी येथील PMRDA कार्यालयाकडे मार्गस्थ झाला आहे.
मागील वीस वर्षांपासून सुरू असलेली वाहतूक कोंडी चाकणच्या औद्योगिक विकासासाठी मोठी अडथळा ठरतं आहे. यामुळे लहान-मोठ्या उद्योगांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसत असल्याची चिंता उद्योजकांनी व्यक्त केली आहे. चाकणसारख्या औद्योगिक क्षेत्राला आवश्यक सुविधा न मिळाल्यामुळे अनेक उद्योजक आता थेट गुजरातसारख्या राज्यांमध्ये मिळणाऱ्या सुविधांचे कौतुक करत महाराष्ट्रातील प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत आहेत.
दरम्यान, PMRDA आणि प्रशासनाने चाकणच्या वाहतूक समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप समितीकडून करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुर्दशा आणि अपुऱ्या नियोजनामुळे त्रस्त नागरिक आता या आंदोलनातून कायमस्वरूपी मार्ग काढण्याच्या निर्धार या आंदोलनातुन दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.