Maharashtra Local Bodies Election Yandex
मुंबई/पुणे

Maharashtra Local Bodies Election: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, 'या' तारखेला होणार सुनावणी

Obc Reservation Hearing In Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे. यासंदर्भात आता १२ जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Rohini Gudaghe

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी प्रकरणाच्या सुनावणीमध्ये' तारीख पे तारीख' असं चित्र पाहायला मिळतंय. कारण स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे. यासंदर्भात आता १२ जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी १६ एप्रिलला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. ही सुनावणी आता १२ जुलैला होण्याची शक्यता आहे.

आत्तापर्यंत या प्रकरणात (Maharashtra Local Bodies Election) चार तारखा सुनावणीसाठी देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावर सुनावणीच झाली नव्हती. आतापर्यंत २८ नोव्हेंबर २०२३, ९ जानेवारी २०२४, ४ मार्च २०२४ आणि १६ एप्रिल २०२४ या तारखा सुनावणीसाठी देण्यात आलेल्या होत्या. या प्रकरणाची शेवटची सुनावणी १ ऑगस्ट २०२३ ला झाली आहे.

त्यानंतर या प्रकरणाची न्यायालयात तारीख देऊनही सुनावणी झालेली नाही. मागील अनेक महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी झालेली नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अंधारात (Obc Reservation Hearing) आहे. या प्रकरणात वारंवार सुनावणी पुढं जात असल्याने या सुनावणीकडे महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे. यामुळे आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात लांबणीवर पडल्या असल्याचं चित्र आहे.

या प्रकरणी मागील दीड वर्षात एकदाही (Supreme Court) सुनावणी झालेली नाही. त्यामुळे आता १२ जुलैला तरी सुनावणी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे. मुंबई आणि पुण्यासह अनेक महानगरपालिका जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य (Obc Reservation) सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर अवलंबून आहे. या सुनावणीसाठी यापूर्वी १६ मे तारीख देण्यात आली होती. पण त्यादिवशीही न्यायालयात कामकाज झालेलं नाही. या सुनावणीसाठी पुढची तारीख देण्यात आलीय. त्यामुळे सुनावणी जवळपास दोन महिन्यांनी लांबणीवर पडलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिझेल नसल्याचे कारण देत अॅम्बुलन्स सेवा नाकारली गरोदर महिलेच्या पोटात नवजात बाळाचा मृत्यू

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात मोठ झाड कोसळले; 12 दुचाकी झाडाखाली अडकल्या

Online earning ideas: घरबसल्या पैसे कसे कमावू शकता?

Petrol- Diesel Price Hike: महागाईचा स्फोट! पेट्रोल-डिझेल ९ रुपयांनी महागणार? सर्वसामान्य नागरिक चिंतेत

Bhagyashree Mote Photos: सबसे कातील, भाग्यश्रीचे फोटो पाहून हेच म्हणाल

SCROLL FOR NEXT