Sikandar Shaikh News  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Kesari 2023: पठ्ठ्याने मैदान मारलं! सिकंदर शेख नवा 'महाराष्ट्र केसरी'; गतविजेत्या शिवराजला आस्मान दाखवलं

66th Maharashtra Kesari Kusti Spardha: गतविजेता शिवराज राक्षे आणि सिकंदर शेख यांच्यामध्ये अंतिम लढत झाली.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी

Maharashtra Kesari Kusti Spardha 2023:

पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम निकाल हाती आला आहे. गतविजेता शिवराज राक्षे आणि सिकंदर शेख यांच्यामध्ये अंतिम लढत झाली. या रोमहर्षक लढतीत सिकंदर शेखने शिवराज राक्षेला आस्मान दाखवत ६६ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा किताब पटकावला आहे.

महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. माती विभागातून संदीप मोटेचा पराभव करुन सिंकदर शेख (Sikandar Sheikh) अंतिम फेरीत दाखल झाला होता. तर तर गादी विभागातून हर्षद कोकाटेला धुळ चारत शिवराज राक्षेने (Shivraj Rakshe) दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

सिकंदर शेख आणि शिवराज राक्षेमध्ये झालेल्या लढतीत शिवराज राक्षेला आस्मान दाखवत सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. अवघ्या २३ सेकंदाच्या लढतीत सिकंदरने बाजी मारली. गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेखला सेमी फायनलमध्ये पराभव स्विकारावा लागला होता. मात्र यंदा त्याने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावत आपणच कुस्तीचा किंग असल्याचे सिद्ध केले आहे.

दरम्यान, या स्पर्धेत 36 जिल्हा आणि 6 महानगरपालिका असे 42 संघ भिडले. या स्पर्धेत 36 जिल्हा आणि 6 महानगरपालिका असे एकूण 42 संघ सहभागी झाले होते. एका कुस्ती संघात गादी विभागातील 10 आणि माती विभागातील 10 असे एकूण 20 कुस्तीगीर 2 कुस्ती मार्गदर्शक आणि 1 संघ व्यवस्थापक असे एकूण 23 जणांचा सहभाग होता. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

When to do heart checkup: भारतातील 30% मृत्यू हार्ट अटॅकमुळेच! धोका टाळण्यासाठी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आणि कधी?

Vice President Election : उपराष्ट्रपतींची निवडणूक कशी होते? नेमकी प्रक्रिया काय असते? जाणून घ्या सविस्तर

UPI Payment: आता पिनशिवाय होणार UPI पेमेंट, फक्त तुमच्या फेस लॉकने

SCROLL FOR NEXT