Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार?, काय म्हणाले बच्चू कडू? सविस्तर वाचा..

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे होते म्हणूनच मी त्यांच्या सोबत गेलो. ते नसतील तर आम्हीही नाही. यात लपवण्यासारखं काहीच नाही. असं प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्टं केलं.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Digital
Published On

Maharashtra Politics

एकनाथ शिंदे होते म्हणूनच मी त्यांच्या सोबत गेलो. ते नसतील तर आम्हीही नाही. यात लपवण्यासारखं काहीच नाही. सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री बदलणार नाहीत आणि बदलण्याचं काही कारणही नाही, असं प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्टं केलं. दरम्यान त्यांनी मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या राजकारणावरही टीका केली आहे.

मराठा आरक्षणावर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, मराठा समाज गेली ७५ वर्षे मागास राहिला आहे. विदर्भातील मराठा कुणबी चालला, पश्चिम महाराष्ट्रातला मराठा कुणबी चालला, कोकणातला चालला मात्र मराठवाड्यातल्या सहा जिल्ह्यातलचा मराठा कुणबी चालला नाही, हा अन्याय नाही का? असा सवाल बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थित केला.

मराठा हा कुणबी नाही असं विजय वडेट्टीवार म्हणतात. त्यांनी तसं दाखवून द्यावं. बोगस नोंदी असल्याचा काहीजण आरोप करतायेत. मात्र निजामकाळापासून नोंदी आढळल्या आहेत आणि त्याही हस्तलिखित सापडल्या आहेत. त्यावर कोणतीही फेरफार करता येत नाही. असं असतानाही राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच जवळपास ५० मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. मागास असल्यामुळेच या आत्महत्या झाल्या नाहीत का? विजय वडेट्टीवार यांना ओबीसी नेते व्हायचं असेल तर नक्की होऊ देत. ओबीसी समाजासाठी काही कार्यक्रम करायचा असेल तर नक्की करू देत. मात्र, दोन समाजांमध्ये तेड निर्माण होऊ नये याची काळजी घ्या, असा सल्ला यावेळी त्यांनी वडेट्टीवार यांना दिला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Politics
Ratnakar Gutte News: मराठा बांधवानी रोखला आमदारांचा कार्यक्रम; आरक्षणाच्या मुद्द्यावरून घेतली भूमिका

मराठा समाजाच्या आरक्षणावरून सध्या राज्यात तणावाची स्थिती आहे. या तापलेल्या वातावरणात सर्वजण आपापली किटली गरम करणार आहेत. त्यातील चहा मात्र कोणाला मिळणार नाही, ज्यांनी किटली गरम केली तेच पिणार आहेत. समाजासमाजामध्ये वरचे नेते भांडत राहिले तर गावागावामध्ये लहान लहान समाजांमध्ये वाद निर्माण होतो. त्यामुळे हे होऊ नये यासाठी सर्व समाजांनी आणि राजकीय नेत्यांनी काळजी घ्यावी असं आवाहनही बच्चू कडू यांनी केलं आहे.

Maharashtra Politics
Ratnakar Gutte News: मराठा बांधवानी रोखला आमदारांचा कार्यक्रम; आरक्षणाच्या मुद्द्यावरून घेतली भूमिका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com