Maharashtra Weather Today: Heavy Rain Alert In Konkan, Ghats & Vidarbha Saam Tv
मुंबई/पुणे

Rain Update : राज्यात मुसळधार पाऊस! पुण्यासह १० जिल्ह्यांना यलो अलर्ट; वाचा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update News : महाराष्ट्रात श्रावण सरींचा जोर कायम असून कोकण, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे. अनेक भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाची शक्यता

  • नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार सरींचा अंदाज

  • विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस

  • संबंधित भागांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट

राज्यात श्रावण सरींचा जोर कायम असून, आज कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे घाट परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, विदर्भातील काही भागांत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असून, विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. राज्यातील उर्वरित भागांत मात्र पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असतानाच तुरळक ठिकाणी श्रावण सरी बरसण्याचा अंदाज आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

पुढील ३ दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. शनिवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र ढगाळ वातावरणासह हलका पाऊस होऊ शकतो. रविवारी बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर आणि भंडारा येथे काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. सोमवारी राज्यात ढगाळ वातावरणासह ठिकठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पुढचे 2 महिने ठरणार गेमचेंजर, DA 63% होणार?

एकनाथ शिंदे आता भाजपला टशन देणार, उत्तर भारताच्या मैदानात शिलेदार उतरवणार, नेत्यांना दिला कानमंत्र

Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा मोठा विक्रम! शतक ठोकत महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली

Maharashtra News Live Update: श्रीनगर विमानतळावर इंडिगोच्या विमानाचा अपघात

Krishna Janmashtami 2026: कृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT