Maharashtra Weather Update: Heavy Rain And Yellow Alert In 11 Districts Saam Tv
मुंबई/पुणे

Rain Update : राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, मुंबईसह ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update News : महाराष्ट्रात आज जोरदार पावसाचा अंदाज असून मुंबईसह ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाची शक्यता; विदर्भात पावसाची १३ टक्के तूट.

Alisha Khedekar

  • मुंबईसह महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट

  • कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस

  • विदर्भाकडे पावसाची पाठ

  • नागपूरमध्ये २१ टक्के, अमरावतीत २६ टक्के आणि चंद्रपूरमध्ये २२ टक्के पावसाची तूट

राज्यात कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून आजही धो धो पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. आज मुंबईसह ११ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि पूर्व विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षिततेचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणात आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांतही काही ठिकाणी मुसळधार सरींचा अंदाज आहे.

दरम्यान, राज्यातील इतर भागांत पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः घाटमाथा आणि पावसाचा जोर असलेल्या भागांत प्रवास करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.

विदर्भाकडे पावसाने पाठ फिरवली

विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने नागरिकांना घाम फुटला आहे. सध्या खरिपातील पिकांना वाढीसाठी पाण्याची गरज असताना पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जुलैअखेर झालेल्या दमदार पावसाने काही प्रमाणात तूट भरून निघाली होती. मात्र ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाने पाठ फिरवल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे. १ जून ते १२ ऑगस्टदरम्यान नागपूर जिल्ह्यात ४८३ मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरी ६१०.६ मिमीच्या तुलनेत २१ टक्के तूट आहे. विदर्भाची एकूण तूट १३ टक्क्यांवर पोहोचली आहे. अमरावतीत सर्वाधिक २६ टक्के, तर चंद्रपूरमध्ये २२ टक्के तूट आहे. बुलढाणा आणि गोंदियात मात्र सरासरीपेक्षा १० टक्के अधिक पाऊस झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wakad Tourism: एका दिवसाच्या सुट्टीत फिरून यायचंय? वाकडजवळच्या 'या' ठिकाणांचा अनुभन तुम्ही घेतलाच पाहिजे

Maharashtra News Live Update : विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड

...तर टॅक्सी-रिक्षाचा थेट परवाना रद्द होणार, सरकारचा ऐतिहासिक निर्णय; काय आहे मोटर वाहन कायदा?

ठाकरे गटाचा अंतिम वार! आज सुप्रीम कोर्टात फुटीर आमदारांच्या अपात्रतेवर महासुनावणी, आतापर्यंत नेमकं काय झालं?

Thursday Horoscope : नव्या संधी मिळतील, ७ राशींना जाणवेल पैशाची तंगी; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT